चंद्रपूर :- कोरोना संकटात नागरिकांचे रोजगार हिरावले असतांना वेकोली भटाळी येथील जी.एन.आर कंपनीत स्थानिकांना डावलून परप्रांतीयांना कामावर ठेवत असल्याने मनसेने जी.एन.आर कंपनी विरोधात आज दि:०२ मे २०२० रोजी सकाळी ११ वा हल्ला बोल आंदोलन करून कंपनीचे कामकाज काही काळ बंद पडले.येत्या दोन दिवसात स्थानिकांना कामावर घेण्याचा निर्णय घ्यावा असा निर्णय घ्यावा असा अलटीमेटम देण्यात आला.अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन छेडन्याचा इशारा मनसे चंद्रपूर शहर अध्यक्ष मनदिप रोडे यांनी जी.एन.आर कंपनी ला दिला आहे.
भटाळी येथील वेकोलीत जी.एन.आर कंपनीत परप्रांतीय मजुरांना आणून काम केले जात आहे.येथील स्थानिक कामगारांना रोजगाराची गरज आहे.त्यांना डावलून आंध्र प्रदेशातून मजूर आणून येथील स्थानिक रोजगार हिरावण्याचे काम जी.एन.आर कंपनीचे अधिकारी करीत आहे. सद्य कोरोना संकटामुळे अनेकांचा रोजगार बंद पडला आहे.स्थानिक हजारो कामगार रोजगार नसल्याने उपासमार सहन करीत आहे.जी.एन.आर कंपनीचा स्थानिकांना रोजगार न देण्याचा निर्णयाने मनसेने तीव्र संताप व्यक्त केला आहे.मनसे चंद्रपूर शहर अध्यक्ष मनदीप रोडे यांनी मनसे कार्यकर्ते ,कामगार,गावकऱ्यांच्या सहकार्याने वेकोली भटाळी येथील जी.एन.आर कंपनीच्या कार्यालयावर हल्ला बोल आंदोलन केले.मनसे च्या आंदोलनाने वेकोली अधिकारी व जी.एन.आर कंपनी च्या अधिकाऱ्यानं मध्ये खळबळ निर्माण झाली.
यावेळी ताबडतोब वेकोली अधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकार्यांसोबत जी.एन.आर कंपनीच्या अधिकाऱ्यांसह बैठक घेउन मनसे च्या स्थानिकांना कामावर घेण्याबाबत चर्चा करण्यात आली.यावेळी मनसे शहर अध्यक्ष मनदीप रोडे यांनी जी.एन.आर कंपनी स्थानिकांना काम देण्यास विरोध करीत आहे.आता पर्यंत जवळ पास २०० कामगार आंध्र प्रदेशातून कंपनीने आणले आहे.आता आणखी १०० कामगार आणण्याच्या तयारीत आहे.स्थानिक कामगारांना कोरोनामूळे रोजगार बंद पडल्याने त्यांना कामाची आवश्यता आहे.कंपनीने आता आवश्यक जागी स्थानिक कामगारांना घ्यावे,अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसे तर्फे दिला आहे.
यावेळी हल्ला बोल आंदोलनात मनसे पदाधिकारी सुमित करपे शहर सचिव मनसे,तुकुम शाखा महिला अध्यक्ष सौ.संगीता ताई धात्रक,तुकुम विभाग अध्यक्ष स्वाभी राऊत,मिथुन महाकुलकर,राम सारवा,कृष्णा दरवे, वसीम शेख, संदीप अरडे,प्रशांत खामत,सुशील ढेडी,रोहन आगडे,किशोर डोये,अमोल साओ,मुकेश बावणे, आशिष शेंडे,प्रेमचंद रामटेके,नरेंद्र राय,राकेश भगत,ब्रिज नंदन आदी महाराष्ट्र सैनिक उपस्थित थे..
0 Comments