खाजगी शाळा महाविद्यालयाकडून शैक्षणिक शुल्क सक्ती करणा-यावर कडक कार्यवाही करा : मनविसे जिल्हाउपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडेचंद्रपूर : सध्याच्या परिस्थीतीत महाराष्ट्राचे नव्हे तर संपुर्ण विश्व कोरोना Covid 19 या महाभयंकर आजाराशी लढा देत आहे. कोरोना या संसर्गजन्य रोगामुळे १६ मार्च पासुन संपुर्ण देशात लॉकडाउन म्हणजेच जमावबंदी व्यापार उद्योग व्यवसाय बंद करण्यात आले. त्यामुळे संपुर्ण अर्थव्यवस्था ही कोसळलेली आहे. या आजाराचा फटका मोठ्या प्रमाणात शिक्षण विभागाला सुद्धा बसलेला आहे. अनेकांच्या रोजगारावर आणि पोटावर या आजारामुळे लॉकडाउन मुळे गदा आलेली आहे. परंतु अशा विनाशकारी परिस्थीतीमध्ये सुद्धा काही खाजगी शााळा - महाविद्यालयाचे sansthapak
प्राचार्य यांच्या सुचनेनुसार त्यांच्या शाळा महाविद्यालय मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याच्या पाल्यांना फोन वारे संपर्क करुन किंवा एस. एम. एस द्वारे शैक्षणिक सत्र 2020 - 21 करिताचे शैक्षणीक शुल्क फी भरण्याचा तकादा लावत आहे अगोदरच खाजगी शाळेच्या फी चे काही नियंत्रण नाही त्यातुन कोरोना मुळे अनेकांचे व्यवसाय बंद पडलेले आहे. अर्थव्यवस्था कोलमडलेली असताना या खाजगी शाळांना त्यांचे काही घेणे देणे नाही.
महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या जनतेची आजची आर्थीक परिस्थीती आपण योग्य प्रकारे जानता अशा परिस्थीतीत सुद्धा जर एखादे मुजोर खाजगी शाळा महाविद्यालय फी ची मागणी करत असेल तर अशा शाळा महाविद्यालयातील संस्थापक आणि प्राचार्यावर योग्य कार्यवाही करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा ही मनविसे जिल्हा उपाधयक्ष कुलदीप चंदनखेडे यांनी दिला आहे.

Post a comment

0 Comments