Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

दारूबंदी उठणार की नाही यावर ठोस निर्णय घेतला जाईल, विजय वडेट्टीवार यांनी माहिती

चंद्रपूर जिल्ह्यात दारू बंदी ठेवावी की उठवावी, यासंबंधीचा समीक्षा करणारा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द केल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. त्यामुळे भविष्यात या प्रश्नावर ठोस निर्णय होईल, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.

राज्यातील लॉकडाऊनची स्थिती आता शिथिल होत असतानाच चंद्रपूरची दारुबंदी उठवण्याच्या हालचालीही वेगवान झाल्या आहेत. राज्याला महसुलाची गरज असल्याने तसा निर्णय घेतला जाण्याची दाट शक्यता आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागानंही दारुबंदी उठवण्याची शिफारस करणारा अहवाल राज्याकडे पाठवल्याची माहिती आहे.

चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनीही तसे संकेत नव्यानं दिले.दारुबंदीची समीक्षा करणारा अहवाल मंत्रिमंडळापुढे ठेवला जाईल. दारुबंदी हा काही उपाय होऊ शकत नाही. दारू बंद करायची असेल तर प्रबोधन होणं गरजेचं आहे, असं वडेट्टीवार म्हणाले. जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत दारूबंदी करूनही दारूची तस्करी थांबली नाही.

उलट अनेक मार्गांनी जिल्ह्यात दारू आणली गेली. जिल्ह्यातील दारू तस्कर वाढले आहेत हे सांगतानाच वडेट्टीवार म्हणाले की, या वाढलेल्या दारू तस्करांना रोखणाऱ्या पोलिसांवरही जीवघेणे हल्ले झाले. दारूबंदीची समीक्षा करणाऱ्या अहवालात अनेकांनी दारू सुरू करण्याची मागणी केल्याची नोंद आहे. त्यामुळे जिल्ह्यात दारू बंदी सुरू ठेवावी किंवा दारू सुरू करावी यावर चर्चा सुरू असून ठोस निर्णय भविष्यात निश्चित होईल, अशी माहिती वडेट्टीवार म्हणाले.

Post a comment

0 Comments