जिवती तालुक्यातील कुंभेझरी येथे गॅस सिलेंडर चा स्पोट


जिवती तालुक्यातील कुंभेझरी या छोट्याश्या गावी नारायण पवार यांचे घरी घरगुती गॅस सिलेंडर चा स्पोट होऊन घराला भीषण आग लागली.या भीषण आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले. शेतीचे काम चालू करण्यासाठी संपूर्ण सामानांची खरेदी बी-बियांन्या सहित एक ऑटो व मोटरसायकल मिळून अंदाजे ६ लाखाच्या वर नुकसान झाले आहे.सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही.संपूर्ण घर जळून खाक झाले तरीही गावकऱ्यांचे आग विझवण्याचे काम सुरूच होते,काही वेळातच गावातील सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने आग विजवण्यात यश आले.
मात्र चार तास झाल्यानंतरही प्रशासकिय यंत्रणा पोहचली नाही...

जिवन तोगरे जिवती 7798114069


Post a comment

0 Comments