टाकळी CCI कापूस खरेदी केंद्राला शिवसेनेचा दणका
शिवसेनेच्या दणक्या मुळे सुटली शेतकऱ्यांची कापूस गाडी किरायाची समस्या

चंद्रपूर जिल्हयामध्ये रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले. त्यामूळे शेतकऱ्यांचा कापूस ओलसर झाला होता, कापसामध्ये ओलसरपणा असल्या मुळे टाकळी C C I केंद्राने तो कापूस खरेदी करण्यास नकार दिला. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान होत आहे. शेतकऱ्यांवर गाडीच्या किरायाच्या रूपात नाहक भुर्दंड बसत होता. यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. हे मनमानी अधिकारी शासनाच्या चांगल्या निर्णयाला हर्ताड फासत आहेत. आणि त्यामुळे शासनाला बदनाम करण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांकडून होत आहे. C C I अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार पणा मूळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना संपर्क साधला असता टाकळी CCI कापूस खरेदी केंद्रावर शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन मत्ते यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे भद्रावती शहरप्रमुख नंदुभाऊ पडाल व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते ज्ञानेश्र्वर डुकरे तथा तालुका संघटक नरेश काळे ,माजी विध्यार्थी सेना शहर प्रमुख
घनश्याम आस्वले,शिवसैनिक येशू आरगी यांनी कापूस खरेदी केंद्रावर जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि कृषी उत्पन्न बाजार समितिच्या
सचिवांना तिथे पाचारण करण्यात आले तसेच भद्रावती चे नायब तहसीलदाराना तिथे पाचारण करण्यात आले. या दोन्ही अधिकाऱ्या समोर त्या मनमानी अधिकाऱ्यांची कैफीयत मांडण्यात आली. कापूस खरेदी केंद्रा मध्ये चर्चा करण्यात आली. या दोन अधिकाऱ्यांनी त्यामध्ये शेतकरी हिताचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना गाडीच्या भाड्याच्या रूपात बसलेला भुर्दंड कृषी उत्पन्न बाजार समिती कडून देण्याचा प्रस्ताव मिळाला व प्रत्येकाला तातडीने गाडीच्या किरायाच्या रूपात 3000 रु. दिले जाईल असे आश्वासन देण्यात आले. सर्व शेतकऱ्यांना हा निर्णय मान्य झाला. आणि अश्या अधिकाऱ्यांची मनमानी थांबली नाही तर, तर शिवसेना एक उग्र आंदोलन हातात घेईल असा इशारा शिवसेनेकडून देण्यात आला. शिवसेनेच्या या दमदार दणक्याच्या कामगिरी मूळे शेतकऱ्यांना त्यांच्या कापसाच्या गाडी चा किराया मिळणार यामुळे शेतकऱ्यांची समस्या सुटली व शेतकऱ्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले

Post a comment

0 Comments