चंद्रपूरच्या बोगस डॉक्टरांवरती कठोर कारवाई करण्यात यावी - अभिनव देशपांडे जिल्हा सचिव राष्ट्रवादी युवक कांग्रेस
देशात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे त्यातच महाराष्ट्र मध्ये सर्वाधिक कोरोना बाधित पेशंट आहे हा प्रसार रोखण्यासाठी डॉक्टरांची मोठी भूमिका आहे त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात बोगस डॉक्टर आहेत जे बिना परवाने, डिग्री नसताना प्रॅक्टिस करीत आहे . या बोगस डॉक्टरांच्या तपासणीमुळे कोरोना चा मोठ्या प्रमाणात पसार होऊन शकतो अशा बोगस डॉक्टरांवर ती तत्काळ कारवाई करण्यात यावी या संदर्भात आज महाराष्ट्र राज्य आरोग्यमंत्री मा. राजेश साहेब टोपे यांना ईमेल द्वारे पत्र पाठविण्यात आले त्याच बरोबर चंद्रपूरचे जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांना देखील निवेदन देण्यात आले. या वेळे कुणाल ठेंगरे (शहर उपाध्यक्ष), कार्तिक निकोडे (शहर महासचिव), शिवम गेडाम (शहर उपाध्यक्ष), सूरज मेश्राम (शहर सचिव), गणेश पोटे आधी कार्यकर्ते उपस्थित होते

Post a comment

0 Comments