अशोकभाऊ जीवतोडे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोणा योद्ध आशा वर्कर्स ला अन्नधान्य किट वाटपचांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव व ओबीसी नेते माननीय अशोकभाऊ जिवतोडे यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक सचिन भोयर व प्राध्यापक नितीन भोयर यांच्यातर्फे अशोक जिवतोडे यांचे हस्ते कोरणा सारख्या महामारीत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता शासनातर्फे मिळणाऱ्या अत्यल्प मानधनावर चंद्रपूर शहर महानगरपालिका हद्दीत आरोग्य सेवेत कार्यरत असणाऱ्या नागरी आरोग्य केंद्र 1 मधील सर्व कोरणा योद्धा आशा वर्कर यांना अन्नधान्य किट वाटप करण्यात आली. शहरी भागात महानगरपालिका कार्यक्षेत्रात येणाऱ्या लोकांची घरोघरी फिरून माहिती गोळा करणे, नागरिकांना पासेस वाटप करणे, आजाराची लक्षणे दिसल्यास नोंद करणे, क्वारंटाईन केलेल्या लोकांवर देखरेख ठेवणे. आदी सर्व कामे कोरणा योद्धा आशा वर्कर स्वतःचा जीव धोक्यात टाकून कोरोना महामारी निर्मूलनासाठी कार्यरत आहे. अशा देशहितार्थ काम करणाऱ्या आशा वर्कर यांना धान्य किट वाटप करण्यात आल्या. यावेळी डॉक्टर आशिष वांढरे, किरण रामिडवार, राकेश पराडकर, तुषार येरमे, अतुल ताजने, संजय फर्दे ,राहुल लटारे, अनिकेत सातपुते,मंगेश चौधरी, अमोल भट ,सुरज अगडे, सुमित उमाटे, प्रतिक हरणे, अंकित मिसाळ, अभिषेक चौधरी, साहिल राऊत ,तेजस चामाटे आदी उपस्थित होते.Post a comment

0 Comments