चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेस तर्फे रक्तदान शिबिर
चंद्रपुर- कोरोना या पाश्र्वभूमीवर मा. मुख्यमंत्री साहेब उद्धवजी ठाकरे यांच्या अहवालाला प्रतिसाद देऊन महाराष्ट्र प्रदेश युवा काँग्रेस चे प्रदेश अध्यक्ष मा.सत्यजित तांबे यांच्या आदेशानुसार मा. पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार व मा.खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष हरीश कोत्तावर यांच्या नेतृत्वात कोरोना वोरियर्स चंद्रपुर जिल्हा युवक काँग्रेस च्या वतीने दि. 05-06-2020 रोजी इंटक भावन, बायपास रोड चंद्रपूर येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले. या कार्यक्रमात शेकडो कार्यकर्त्यांनी रक्तदान करून सहकार्य केले.
सदर कार्यक्रमात शहर जिल्हा अध्यक्ष नांदुभाऊ नागरकर, माजी युवक काँग्रेस अध्यक्ष शिवाराव इंटक अध्यक्ष चंद्रमा यादव जयसिंग डोंगरे वैद्यनिक अधिकारी पंकज पवार समाज सेवा अधीक्षक, श्रीमती रामटेके मॅडम प्रयोगशाळा तंत्रज्ञ डेविड सोनवाने, अंकित शिंगाडे,रुपेश घुमे लक्ष्मण नगराळे यांची विशेष उपस्थिती होती. 
कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता जिल्हा महासचिव रमिज शेख महासचिव सुरज कन्नूर महासचिव राजेश नक्कावर, प्रदेश सचिव रुपेश दवे,विधानसभा अध्यक्ष राजेश अडूर,जिल्हा सचिव अजय चिनूरवार,आतिप रजा, वैभव रघाताटे ,नफिज शेख , नवीन कोलेपल्ली, श्रावण अरकीला, नागेश कुटला, सुफियान खान , हमद खान,सुफियान पठाण, सैयद सारफराज अली, शाहिद शेख , रफिक खान ,राजू मेश्राम उपस्थीत होते.

Post a comment

0 Comments