चंद्रपूर :- संपूर्ण देश कोरोना या विषाणूसोबत
संघर्ष करत आहे़. या संघर्षात मोलाचा हातभार लावण्यासाठी आज इंदिरा नगर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.कोरोनाग्रस्त रुग्णांना रक्ताची कमतरता भासू नये, यासाठी व. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्पोर्टिंग आणि व. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय संस्थेमार्फत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात 26 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
रक्तदान करण्यासाठी या ठिकाणी आलेल्या तरुणांच्या आरोग्याची विशेष काळजी शिबिरात घेण्यात आली होती. दरम्यान, रक्तदान शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरातून रक्तदान हेच श्रेष्ठदान हा संदेश देण्यात आला. या शिबिरासाठी या संस्थेच्या पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले. रक्तदानाकरिता आलेल्या रक्तदात्याचे मनापासुन आभार मानण्यात आले. तसेच वैद्यकीय कर्मचारी यांचे सुद्धा आभार मानण्यात आले.