खाजगी बँक, फायनान्स कंपनी, गोल्ड लोन यांचावर कार्यवाही करा: मनविसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे यांची मागणीचंद्रपूर : आजचा संपूर्ण देशात नाही तर पूर्ण विश्व हे कोरोना कोविड-19 या महाभयंकर संसर्गजन्य आजारापासुन आपआपल्या देशातील नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी कोरोना या रोगाशी लढा देत आहे. या आजाराचा जास्त प्रभाव जणसामान्यवर होऊ नये या करिता संपूर्ण भारतात आणि महाराष्ट्रात सुद्धा लोकडाऊन(जमावबंदी) करण्यात आली आणि16 मार्च ते आजपर्यंत सुद्धा हे लॉकडाऊन अशेच सुरू आहे या लॉकडाऊन काडामध्ये देशातील, राज्यातीलच नवे तर आपल्या राज्यातील जनसामान्यांच्या रोजगारावर आर्थिक परिस्थितीवर मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम झाला. अतिआवश्यक सेवा वगडता अवघा महाराष्ट्र ठप्प झाला या लॉकडाऊन मुळे देशातील आणि महाराष्ट्रातील आर्थिक परिस्थिती फार बिकट झाली.
आधीच या परिस्थिती मुळे जनसामान्यवर असलेल्या आर्थिक बोझा काही प्रमाणात कमी व्हावा या हेतुने केंद्रीय वित्त मंत्रालयाने देशातील सर्व बँक, फायनान्स कंपनी, गोल्ड लोन यांना लॉकडाऊनच्या काडा मध्ये ग्राहका कडुन कुठल्याही प्रकारचा व्याज घेण्यात येऊ नये असे सक्त निर्देश देण्यात आले होते. परंतु केंद्रीय मंत्रालयाच्या या निर्देशाला केराची टोपली दाखवत आपल्या चंद्रपूर जिल्यातील काही मुजोर बँक, फायनान्स कंपनी, गोल्ड लोन यांनी त्यांचा ग्राहका कडुन नियमित पणे व्याज भरण्याचा ताकादा लावला आहे आणि व्याज भरण्यात आले नाही तर त्यांच्यावर अतिरिक्त व्याज लाऊन ग्राहकांना आर्थिक मंदीच्या काडत लुटण्याचा सफाटा सुरू केलेला आहे अगोदरच या लॉकडाऊन मुळे जांसमान्यवर उपास मारीची वेळ आलेली आहे 2 ते 3 महिन्यापासुन त्यांचा हाताला काम नाही उदयोग धंदे बंद आहे रोजगार बुडाला आशा या बिकट परिस्थिती मध्ये तो आपल्या कर्जाचे हप्ते कशे फेडणार.
म्हणून आम्ही मा.जिल्हाधिकारी साहेबांना देण्यात आलेल्या निवेदनात विनंती केली आहे की आपण अशा बँक,फायनान्स कंपनी, गोल्ड लोन यांच्या संचालकांना निर्देश द्यावे की कुठल्याही ग्राहकाकडुन लॉकडाऊन चा कार्यकाळ संपेपर्यंत आणि ग्राहकांची अर्थीक परिस्तिथी सामान्य होई पर्यंत ग्राहकांना कर्जाचे हप्ते आणि व्याज भरण्याचा तकादा बैंक फायनान्स कंपन्यांनी लाउ नये आणि ग्राहकांना आत्महत्येस प्रवृत्त करू नये अन्यथा आपल्यावर कठोर कारवाई करावी
या आशयाचे निवेदन मा जिल्हाधिकारी साहेब यांना मनविसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांचा मार्गदर्शनात जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे यांचा नेतृत्वात देण्यात आले.आणि जर या नंतरही कुठल्याही ग्राहकाची तक्रार आल्यास मनसे स्टाईल नी अशा मुजोर बैंक आणी फायनान्स कंपन्यांना धडा शिकवीण्यात येईल असे कुलदीप चंदनखेडे यांनी बजावून सांगितले. या वेडेस जिल्हा उपाध्यक्ष सचिन भोयर जिल्हा सचिव किशोर मडगुलवार,शहर अध्यक्ष मंदिप रोडे, मनविसे तालुका उपाध्यक्ष प्रवीण शेवते, मनसे सचिव फिरोज शेख ,मनविसे तालुका अध्यक्ष विवेक धोटे, शहर अध्यक्ष नितीन पेनदाम,प्रकाश नागरकर, नितेश जुमडे, तुषार येरमे, करण नायर आणि मनसे पधाधिकारी उपस्थित होतेPost a comment

0 Comments