Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

वाघाचा हल्ल्यात शेतकरी ठारनागभीड :- वनपरिक्षेत्रांतार्गत तुकूम येथील शेतकरी आपल्या शेतावर काम करीत असताना वाघाने केलेल्या हल्ल्यात शेतकरी ठार झाल्याची घटना घडली. सदर घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. राजेंद्र गणवीर (५५) असे ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. दरम्यान वन्यजीव हल्ल्यांची ही जिल्ह्यातील पंधरावी घटना ठरली आहे. नागभीड वनपरिक्षेत्रांतार्गत तुकूम येथील राजेंद्र गणवीर हा शेतकरी आपल्या शेतात काम करण्यासाठी गेला होता.


शेतावरून परत न आल्याने नातेवाईकांनी गावकऱ्यांच्या मदतीने शेताच्या आजूबाजूचा परिसरात शोध घेतला. परंतु अंधार झाल्याने रात्री उशिरा ते घरी परतले. पुन्हा सकाळी शेतात जाऊन शोध घेण्याचा प्रयत्न केला असता मृतकाच्या चपला व वाघाच्या पंजाचे ठसे दिसून आले.शेतलगत असलेल्या जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने शेतात येऊन शेतकऱ्यावर हल्ला करीत त्याला ठार केले व त्याचा मृतदेह घटनास्थळावरून १५० मीटर दूर घनदाट जंगलात ओढत नेला. नागभीड वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक ६२४ मध्ये अर्धवट खालेल्या स्थितीत शेतकऱ्याचा मृतदेह आढळून आला.

Post a comment

0 Comments