युवा सेना प्रमुख तथा पर्यावरण मंत्री मा, आदित्यजी ठाकरे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेने तर्फे औषध व मास्क वाटपचंद्रपूर :- युवासेनाप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री मा. आदित्य साहेब ठाकरे यांनी कोरोनामुळे माझा वाढदिवसाला कोणत्याही प्रकारचा जल्लोष व बॅनरबाजी न करण्याचे आव्हान केले व सामाजिक उपक्रम राबवून माझा वाढदिवस साजरा करावा. असे शिवसैनिकांना आणि युवसैनिकाना आवाहन केले होते. त्यानुसार आज दि.१३ जून २०२० रोज शनिवारला शिवसेना जिल्हा प्रमुख मा. संदीपभाऊ गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनात मातोश्री वृद्धाश्रमात Arcenium Album 30 C औषधचे सर्व वृद्धांना वाटप करण्यात आले, या औषधमुळे कोरोना सोबत लढण्यास प्रतिकार शक्ती मिळत असते. शिवसेना ही औषध येणाऱ्या दिवसात मोठया प्रमाणात वाटप करणार आहे, तसेच मातोश्री वृद्धाश्रम मध्ये कापडी मास्कचे वाटप करण्यात आले, यावेळी महिला महिला आघाडीच्या शोभा ताई वडोने, प्रकाश चंदनखेडे, हर्षद कानमपल्लीवार, पिंटू धिरडे, अभिलाष कुंभारे, प्रवीण सर उपस्थित होते.

Post a comment

0 Comments