चिमूर वरोरा मार्गावरील लोखंडी पूल जवळ दुचाकीस्वार कुणाल विलास नन्नावरे (वय 16 वर्ष) दुचाकीने जात असताना दुचाकी स्लिप झाल्याने खाली पडला तेव्हा त्याच्या डोक्यावरून हायवा ट्रक गेल्याने अपघातात ठार झाला असून एक जखमी झाला आहे
ताडगाव ता समुद्रपूर जिल्हा वर्धा येथील अमोल अंबादास ननावरे वय 23 वर्ष हा आपल्या क्र mh x 0695 दुचाकीने सोबत कुणाल विलास ननावरे वय 16 वर्ष याला सोबत घेऊन चिमूर कडे येत असताना लोखंडी पुलाजवळ दुचाकी स्लिप झाल्याने पडले तेव्हा मागेहुन निष्काळजीपणा व भरधाव पणे हायवा ट्रक क्रमांक mh-40 Bl- 8663या ट्रक खाली पडलेल्या कुणाल च्या डोक्यावरून गेल्याने जागीच मरण पावला तर दुसरा जखमी झाला असून उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे
हायवा ट्रक पोलिसांनी पकडले असून
सदर ट्रक चालक याचे विरुद्ध कलम 279, 337,304 अ भा.द.वि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून ट्रक चालक महेंद्र अशोक चावट रा. गाणगापूर ता.उमरेड जी नागपूर यास अटक करन्यात आले असून तपास ठाणेदार स्वप्नील धुळे करीत आहे.