Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

नायब तहसीलदार अजय भास्करवार यांचा अपघाती मृत्यू
चंद्रपूर 7, जून : चंद्रपुर तहसील कार्यालयामध्ये कार्यरत असलेले नायब तहसीलदार अजय भास्करवार यांचा आज अपघाती मृत्यू झाला आहे. चंद्रपूर शहरालगत असलेल्या चिचपल्ली मार्गावर कार झाडाला धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की यामध्ये तहसीलदार अजय भास्करवार यांना आपला जीव गमवावा लागला.

अपघातग्रस्त कारमध्ये अजय भास्करवार हे एकटेच असल्याची माहिती आहे. अपघात झाल्यानंतर अजय भास्करवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र तिथं डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. अनेक वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी रुग्णालयाला भेट दिली. सध्या या अपघाताप्रकरणी रामनगर पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies