Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

जिल्ह्यात दाखल 71 हजारांवर नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण;4 हजारांवर नागरिक गृह अलगीकरण प्रक्रियेत

चंद्रपूर, दि.9 जून: जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 39 झाली आहे. यापैकी, आतापर्यंत 22 कोरोना बाधित कोरोना मुक्त होऊन सुटी देण्यात आली आहे.सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथे विलगीकरण कक्षात एक कोरोना बाधित व 16 कोरोना बाधित कोविड केअर सेंटर, वन अकादमी चंद्रपूर येथे भरती करण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील एकूण ॲक्टिव रुग्णांची संख्या 17 असुन या रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. नागरिकांनी कलम 144 चे सक्त पालन करावे. नागरिकांकडून प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन न झाल्यास कार्यवाही करण्यात येणार आहे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिलेले आहे.

कोविड-19 संक्रमित 39 बाधीतांची चंद्रपूर जिल्ह्यात इतर राज्यातून, जिल्ह्यातून,रेडझोन मधून प्रवास केल्यामुळे बाधीतांची संख्या वाढली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राज्यनिहाय व जिल्हानिहाय एकूण संख्या पुढील प्रमाणे आहे. दिल्ली -2, हरियाणा (गुडगाव)-1, हैद्राबाद-1, मुंबई-7, ठाणे -3, पुणे-6, यवतमाळ -4, नाशिक -3, गुजरात-1, जळगांव-1, ओडीसा-1, कोणत्याही प्रकारचा प्रवासाचा इतिहास नाही किंवा पॉझिटिव्ह रुग्णांचे सहवासीत - 9 आहेत.

जिल्ह्यात एकूण 21 कंटेनमेंट झोन कार्यान्वित करण्यात आलेले आहे. यापैकी 12 कंटेनमेंट झोनचे 14 दिवस पूर्ण झाले आहे. त्यामुळे सदर झोन बंद करण्यात आलेले आहे. सध्या जिल्ह्यात 9 कंटेनमेंट झोन कार्यरत आहेत. आजपर्यंत एकूण 21 कंटेनमेंट झोनमधील आयएलआय रुग्णांचे 45 स्वॅब घेण्यात आलेले आहे. यापैकी 44 नमुने निगेटिव्ह व 1 नमुना प्रतीक्षेत आहेत.

सर्व कंटेनमेंट झोनमध्ये रुग्णांचा व इतर सर्व रुग्णांचा नियमित पाठपुरावा सुरू आहे. कंटेनमेंट झोनमध्ये सर्व कुटुंबातील लोकसंख्येचे दैनंदिन 14 दिवस आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पथकामार्फत सर्वेक्षण करण्यात येत आहे.आयएलआय व सारीचे रुग्ण शोधून त्यांना उपचाराखाली आणण्यात येत आहे. तसेच आयएलआय व सारी रुग्णांचे स्वॅब नमुने घेण्यात येत आहेत.

जिल्ह्यामध्ये 1 हजार 793 स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविले होते. यापैकी 39 नमुने पॉझिटिव्ह, 1 हजार 541 नमुने निगेटिव्ह तर 213 नमुने प्रतीक्षेत आहेत.

दिनांक 9 जून रोजी एकूण जिल्ह्यातील संस्थात्मक अलगीकरणात 1 हजार 139 नागरिक आहेत. ग्रामस्तरावर 466 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात आहेत.तालुकास्तरावर 366 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात आहेत. तर, जिल्हास्तरावर 307 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत परराज्यातून,जिल्ह्यातून 76 हजार 252 नागरिक दाखल झाले आहेत.तसेच 71 हजार 278 नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण झालेले असून 4 हजार 974 नागरिकांचे गृह अलगीकरण प्रक्रियेत आहे.

चंद्रपूरमध्ये आतापर्यत 2 मे ( एक बाधीत ), 13 मे ( एक बाधीत), 20 मे ( एकूण 10 बाधीत ), 23 मे ( एकूण 7 बाधीत),24 मे ( एकूण 2 बाधीत), 25 मे ( एक बाधीत ), 31 मे ( एक बाधीत ), 2 जून (एक बाधीत), 4 जून ( दोन बाधीत), 5 जून ( एक बाधीत),6 जून ( एक बाधीत), 7 जून ( 11 बाधीत) अशा प्रकारे जिल्ह्यातील कोरोना बाधीत 39 झाले आहेत. आतापर्यत 22 बाधीत बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे 39 पैकी अॅक्टीव्ह बाधीतांची संख्या आता 17 आहे.

बाहेरून येणाऱ्या नागरिकांनी नोंदणी व आरोग्य तपासणी करावी :

बाहेरून येणाऱ्या नागरिकांनी चंद्रपूर शहरात शकुंतला लॉन येथे नोंद व तपासणी करावी. जिल्ह्याच्या अन्य तालुक्याचे ठिकाणी बस स्टॅन्ड परिसरात ही आरोग्य तपासणी व नोंदणी सुरू आहे. जबाबदार नागरिक म्हणून बाहेरून आलेल्या प्रत्येक नागरिकांनी आपल्या नावाची नोंदणी व आरोग्य तपासणी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies