चंद्रपूर मूल मार्गावर ट्रक पलटी चालकासह 3 जण गंभीर जखमी
चंद्रपूर मुल मार्गावरील एम इ एल समोर डीवाइडर वर चढून एम एच 34 ए वि 2869 ट्रक पलटी झाला. त्यामध्ये गाडी चालकासह 3 जण जखमी झाले. रात्री शतपावली म्हणून फिरायला जाणाऱ्या पैकी 2 जण यामध्ये ट्रक च्या ओझ्या खाली दबले होते. तिथल्या स्थानिक लोकांच्या मदतीने त्या दोघांना ट्रक च्या ओझ्यातून बाहेर काढण्यात आले. व त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. त्या दोघांपैकी एक गंभीर जखमी आहे. घटनास्थळी रामनगर पोलिस दाखल झाले.

मुल मार्गांनी चंद्रपूरला येत असताना एम एल समोर महानगरपालिके तर्फे बांधण्यात आलेल्या डीवाईडर मुळे या भागांमध्ये अनेकदा एक्सीडेंट झाले आहे. हे डीवाईडर इथून हटवावे अशी मागणी या भागातील लोकांनी अनेकदा केली, मात्र महानगरपालिकेने इथल्या लोकांना गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात एक्सीडेंट सारख्या घटना घडत असतात.

Post a comment

0 Comments