Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

पोंभूर्णा तील 26 वर्षीय युवक कोरोना पॉझिटिव्हचंद्रपूर,दि. 21 जून: जिल्ह्यातील पोंभूर्णा तालुक्यातील कासरगट येथील 26 वर्षीय युवक कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार नवी दिल्ली येथून 20 जून रोजी परत आलेल्या या युवकाने नागपूर एअरपोर्टवरून थेट शकुंतला लॉन येथे येत तपासणी केली होती. नवी दिल्ली येथे असताना त्याला तापाची लक्षणे होती. त्यामुळे शकुंतला लॉन येथून तपासणी केल्यानंतर चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. याठिकाणी त्याचा स्वॅब नमुना घेण्यात आला होता. 21 तारखेला त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. हा युवक सध्या वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल असून त्याची प्रकृती स्थिर आहे.

आतापर्यंतची बाधितांची संख्या 56 आहे. यापैकी 43 कोरोना बाधित कोरोना मुक्त झालेले आहेत.त्यामुळे त्यांना सुटी देण्यात आलेली आहे. सध्या अॅक्टिव्ह बाधीतांची संख्या 13 आहे. या सर्व बाधीतांची प्रकृती स्थिर आहे.

17 कंटेनमेंट झोन बंद तर 8 कंटेनमेंट झोन कार्यरत:

जिल्ह्यात एकूण 25 कंटेनमेंट झोन कार्यान्वित करण्यात आलेले आहे. यापैकी 17 कंटेनमेंट झोनचे 14 दिवस पूर्ण झाले आहे. त्यामुळे सदर झोन बंद करण्यात आलेले आहे. सध्या जिल्ह्यात 8 कंटेनमेंट झोन कार्यरत आहेत.

कंटेनमेंट झोनमध्ये आरोग्य पथकामार्फत सर्वेक्षण:

आजपर्यंत एकूण 25 कंटेनमेंट झोनमधील आयएलआय रुग्णांचे 59 स्वॅब घेण्यात आलेले आहे. यापैकी 58 नमुने निगेटिव्ह,एक पॉझिटिव्ह आहे. सर्व कंटेनमेंट झोनमध्ये रुग्णांचा व इतर सर्व रुग्णांचा नियमित पाठपुरावा सुरू आहे. कंटेनमेंट झोनमध्ये सर्व कुटुंबातील लोकसंख्येचे दैनंदिन 14 दिवस आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पथकामार्फत सर्वेक्षण करण्यात येत आहे.आयएलआय व सारीचे रुग्ण शोधून त्यांना उपचाराखाली आणण्यात येत आहे. तसेच आयएलआय व सारी रुग्णांचे स्वॅब नमुने घेण्यात येत आहेत.

कोविड-19 संक्रमित 56 बाधितांची चंद्रपूर जिल्ह्यात इतर राज्यातून, जिल्ह्यातून, रेडझोन मधून प्रवास केल्यामुळे बाधितांची संख्या वाढली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राज्यनिहाय व जिल्हानिहाय एकूण संख्या पुढील प्रमाणे आहे. दिल्ली -5, हरियाणा (गुडगाव)-1, ओडीसा-1, गुजरात-4, हैद्राबाद-1, मुंबई-9, ठाणे -3, पुणे-6, नाशिक -3, जळगांव-1, यवतमाळ -4, प्रवासाचा कोणताही इतिहास नसलेले-4, संपर्कातील व्यक्ती - 14 आहेत.

तालुकानिहाय बाधितांची संख्या:

ग्रामीण भागामध्ये तालुका चंद्रपूर 7, बल्लारपूर दोन, पोंभूर्णा दोन, सिंदेवाही दोन, मुल तीन, ब्रह्मपुरी 12, नागभीड चार बाधित आहे. शहरी भागामध्ये बल्लारपूर तीन, वरोरा दोन, राजुरा दोन, मुल एक, भद्रावती एक, ब्रह्मपुरी एक, कोरपणा एक, नागभिड एक बाधित आहेत. तर चंद्रपूर महानगरपालिका भागामध्ये कृष्णनगर दोन, बिनबा गेट एक, बाबुपेठ दोन, बालाजी वार्ड एक, भिवापूर वार्ड एक, शास्त्रीनगर एक, सुमित्रानगर चार बाधित आहेत. असे एकूण बाधितांची संख्या 56 वर गेली आहे.

आरोग्य सेतू ॲपचा वापर करून बाधीतांची शोध मोहीम :

दिनांक 11 जून पासून आरोग्य सेतू ॲप वरील मिळालेल्या माहितीच्या आधारे ब्लूटूथ निकटता (ब्लूटूथ प्रॉक्सीमिटी) गंभीर आजार असलेले, कोविडचे संभाव्य लक्षणे असणाऱ्या (अनवेल कोमॉरबीडीटी) व्यक्तींचा डाटा प्राप्त करून मुख्य वैद्यकीय अधिकारी (महानगरपालिका चंद्रपूर), संबंधित तालुका आरोग्य अधिकारी,उपजिल्हा रुग्णालय,ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांना यादी पाठविण्यात येते.सदरील व्यक्तींची आरोग्य तपासणी करून जवळच्या कोविड केअर सेंटरला संदर्भित करून व स्वॅब घेवून शोध मोहीम सुरू केलेली आहे.

कोविड-19 ची सर्वसाधारण माहिती :

जिल्ह्यामध्ये 3 हजार 11 स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविले होते. यापैकी 56 नमुने पॉझिटिव्ह,2 हजार 648 नमुने निगेटिव्ह, 281 नमुने प्रतीक्षेत तर 26 अनिर्नयीत आहेत.

असे आहे जिल्ह्यातील अलगीकरण:

जिल्ह्यातील एकूण संस्थात्मक अलगीकरणात 1 हजार 48 नागरिक आहेत. ग्रामस्तरावर 392 नागरिक,तालुकास्तरावर 365 नागरिक तर, जिल्हास्तरावर 291 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 79 हजार 318 नागरिक दाखल झाले आहेत.तसेच 74 हजार 681 नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण झालेले आहे. 4 हजार 637 नागरिकांचे गृह अलगीकरण सुरू आहे.

आतापर्यंतचे कोरोना बाधीतांचे विवरण :

चंद्रपूरमध्ये आतापर्यत 2 मे ( एक बाधित ), 13 मे ( एक बाधित), 20 मे ( एकूण 10 बाधित ), 23 मे ( एकूण 7 बाधित), 24 मे ( एकूण 2 बाधित), 25 मे ( एक बाधित ), 31 मे ( एक बाधित ), 2 जून (एक बाधित), 4 जून (दोन बाधित), 5 जून ( एक बाधित),6 जून ( एक बाधित), 7 जून ( 11 बाधित),9 जून (एकुण 3 बाधित), 10 जून ( एक बाधित), 13 जून ( एक बाधित), 14 जून ( एकुण तीन बाधित),15 जून (एक बाधित), 16 जून ( एकुण 5 बाधित), 17 जून ( एक बाधित), 18 जून ( एक बाधित) आणि 21 जून (एक बाधित) अशा प्रकारे जिल्ह्यातील कोरोना बाधित 56 झाले आहेत. आतापर्यत 43 बाधित बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे 56 पैकी अॅक्टीव्ह बाधितांची संख्या आता 13 आहे.

बाहेरून येणाऱ्या नागरिकांनी नोंदणी व आरोग्य तपासणी करावी :

बाहेरून येणाऱ्या नागरिकांनी चंद्रपूर शहरात शकुंतला लॉन येथे नोंद व तपासणी करावी. जिल्ह्याच्या अन्य तालुक्याचे ठिकाणी बस स्टॅन्ड परिसरात ही आरोग्य तपासणी व नोंदणी सुरू आहे. जबाबदार नागरिक म्हणून बाहेरून आलेल्या प्रत्येक नागरिकांनी आपल्या नावाची नोंदणी व आरोग्य तपासणी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies