माणिकगड सिमेंट कंपनी च्या कामगारांना पूर्ण पगार देण्याची मागणी
प्रतिनिधी. कोरपना. मंगेश तिखट रा. नारंडा. मो 9356217509
कोरपना:- तालुक्यातील माणिकगढ सिमेंट कंपनीच्या ठेकेदारी कामगारांना 10 दिवसाचे पैसे कापत करून फक्त 20 दिवसाचे पेमेंट करण्यात आले आहे. आज कोरोनाचे संकट संपूर्ण जगात पसरले आहे. पण या सगळ्या मधून सामान्य माणसाचे खच्चीकारण होते आहे. आज असाच प्रकार कंपनी मध्ये दिसून येत आहे .सर्व गोर गरीब मजूर कामगार रात दिवस काम करून जर हातामध्ये अर्धा पगार मिळत असेल तर तो कामगार जगेल कसा काय खाईल. काई देईल? आज अनेक कुटूंबातील व्यक्ती कंपनी मध्ये काम करून घर संसार पालन पोषण करत असतो. या कंपनी मध्ये विविध भागामधील व्यक्ती काम करत असतात. कोणी भाड्याच्या घरा मध्ये राहत असतात. तर कोणी स्वतः च्या घरामध्ये राहत असतात . त्याला एक वेळ खाण्याचा प्रश्न पडतो. तर यातच त्याची आर्थिक पगार कपात होते असेल तर गोर गरीब कामगार जगेल कस? प्रतिनिधी मदत करत दिसत नाही. युनियन लीडर सुद्धा समस्या सोडवताना दिसत नाही. कामगार कमी पगार घेऊ शकत नाही व स्वतःहा समस्या सोडवू शकत नाही. त्यांचा कोण वाली आहे. कामगार काम करून कमी पगारात काय होणार आहे. आज कोरोना संकट गोर गरीब बेकार परिस्थिती या कामगारांना वर येऊन आहे. कोणी लक्ष दयायला व समस्या सोडवायला तयार नाही.असा आरोप कामगारांनी केला आहे. पण ठेकेदाराच्या मनमर्जीने कामगारांना मिळाला अर्धवट पगार या कंपनीच्या माध्यमातून माणुसकी फाउंडेशन चे सदस्य बंटी विश्वास यांनी प्रकरणात कामगारांना न्याय मिळत नाही त्यांची दाखल घेऊन पूर्ण पगार कामगारांना मिळालाच पाहिजे अशी मागणी केली

Post a comment

0 Comments