1 जुलै रोजी चंद्रपूर जिल्‍हयात भाजपातर्फे होणार वृक्षारोपणचंद्रपूर :- गेल्या सरकारच्‍या कार्यकाळात तीन वर्षात 50 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्‍प करत हरीत महाराष्‍ट्र ही संकल्‍पना राबविणारे व राज्‍यात विक्रमी वृक्ष लागवड करणारे राज्‍याचे माजी वनमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने चंद्रपूर जिल्‍हयात दिनांक 1 जुलै रोजी वृक्षारोपण करण्‍यात येणार असून त्‍यानिमीत्‍ताने पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्‍या दुस-या टर्ममधील वर्षपूर्ती निमीत्‍ताने त्‍यांचे पत्र व त्‍यांनी घेतलेल्‍या निर्णयाची पत्रके यांचे वितरण भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते करणार आहेत
हरीत महाराष्‍ट्र ही संकल्‍पना राबविण्‍याच्‍या दृष्‍टीने राज्‍यात तीन वर्षात 50 कोटी वृक्षलागवड करण्‍याचा निर्धार जाहीर केला होता. सन 2016 मध्‍ये 1 जुलै 2016 रोजी एकाच दिवशी 2 कोटी वृक्षलागवड करण्‍याचे त्‍यांनी जाहीर केले होते. वृक्षारोपणाच्‍या या मोहीमेला जनतेचा उदंड प्रतिसाद लाभला. राज्‍यात 2 कोटी 83 लक्ष इतकी वृक्षलागवड करण्‍यात आली. त्‍यानंतर 2017 मध्‍ये 1 जुलै ते 7 जुलै या कालावधीत 4 कोटी वृक्षलागवडीचा संकल्‍प करण्‍यात आला होता. यावेळी सुध्‍दा 5 कोटी 43 लक्ष झाडे राज्‍यात लावण्‍यात आली. सन 2018 मध्‍ये 1 जुलै ते 30 जुलै 13 कोटी वृक्षलागवड करण्‍याचा संकल्‍प करण्‍यात आला होता. या संकल्‍पाच्‍या पुर्तेतेसाठी सुध्‍दा जनतेचा लक्षणीय सहभाग लाभला व राज्‍यात 15 कोटी 88 लक्ष वृक्षलागवड करण्‍यात आली. या विक्रमी वृक्षलागवडीची नोंद लिमका बुक ऑफ रेकॉर्डने घेतली असुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुध्‍दा मन की बात या कार्यक्रमात या मोहीमेचे कौतुक केले.
यावर्षी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्‍या दुस-या टर्ममधील वर्षपूर्तीचे औचित्‍य साधत त्‍यानिमीत्‍ताने आ. सुधीर मुनगंटीवार 1 जुलै रोजी चंद्रपूरात सकाळी 10 वा. हवेली गार्डन परिसरात वृक्षारोपण करणार आहे. त्‍यानंतर दुर्गापूर परिसरात व मुल पंचायत समिती परिसरात सुध्‍दा ते वृक्षारोपण करणार आहे. माजी केंद्रीय गृह राज्‍यमंत्री हंसराजजी अहीर वरोरा शहरात, भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष हरीश शर्मा सिंदेवाही येथे, आ. बंटी भांगडीया चिमूर येथे, माजी जि.प. अध्‍यक्ष तथा भाजपाचे जिल्‍हा सरचिटणीस देवराव भोंगळे घुग्‍गुस, जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा सौ. संध्‍या गुरनुले डोंगरगांव येथे, राजेंद्र गांधी सावली येथे, प्रा. अतुल देशकर कापसी येथे, जि.प. सदस्‍य संजय गजपूरे पळसगाव जाट येथे, जि.प. सदस्‍य ब्रिजभूषण पाझारे धाबा येथे, खुशाल बोडे कोरपना येथे, राहूल सराफ गडचांदूर येथे, पंचायत समिती पोंभुर्णाच्‍या सभापती अलका आत्राम बेंबाळ येथे, मुलच्‍या नगराध्‍यक्षा सौ. रत्‍नमाला भोयर मुल येथे, जि.प. सदस्‍या सौ. नितू चौधरी पोंभुर्णा येथे, चंद्रपूरच्‍या महापौर सौ. राखी कंचर्लावार बल्‍लारपूर येथे, भाजपाच्‍या जिल्‍हाध्‍यक्षा सौ. रेणुका दुधे येनबोडी येथे, चंदनसिंहजी चंदेल राजुरा येथे, सुदर्शनजी निमकर गोवरी येथे, जैनुद्दीन जव्‍हेरी गोंडपिपरी येथे, सौ. गोदावरी केंद्रे कोरपना येथे, रामलाल दोनाडकर ब्रम्‍हपूरी येथे, प्रा. उमाजी हिरे नागभीड येथे, संतोष रडके गिरगाव येथे, डॉ. श्‍याम हटवादे नेरी येथे, राजू देवतळे भिशी येथे, राजू झाडे खडसंगी येथे, राजू गायकवाड बोर्डा येथे, ओम मांडवकर शेगाव येथे, बाबा भागडे टेमुर्डा येथे, विजय राऊत भद्रावती येथे, प्रविण सुर माजरी कॉलरी येथे, मारोती गायकवाड जेना येथे, सौ. अर्चना जिवतोडे नंदोरी येथे, प्रमोद कडू दुर्गापूर येथे, येथे, नामदेव डाहूले मोरवा आणि छोटा नागपूर येथे, अनिल डोंगरे विचोडा येथे, संतोष द्विवेदी नागाळा येथे वृक्षारोपण करणार आहे.

Post a comment

0 Comments