Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

गोंड‍वाना विद्यापीठातील पदभरती प्रक्रिया पुढे ढकलावी – भाजयुमोची मागणीगोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीतर्फे प्राध्‍यापक, सहाय्यक प्राध्‍यापक आणि सहप्राध्‍यापक या पदांसाठी घेण्‍यात येणारी पदभरती प्रक्रिया पूढे ढकलण्‍याची मागणी भारतीय युवा मोर्चाचे सूरज पेदूलवार आणि प्रज्‍वलंत कडू यांनी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍याकडे केली आहे
 
चंद्रपूर/MH34UPDATENEWS:-
गोंडवाना विद्यापिठाद्वारे दि २०/०३/२०२० ला प्राध्यापक भरती करण्याकरीता जाहिरात देण्यात आली विद्यापिठाद्वारे दिलेल्या सुचना क्र . GUG / 33 / 2020 प्रमाणे पात्र उमेदवाराला दि .२० / ०४ / २०२० पर्यंत अर्जाची ११ प्रत विद्यापिठात स्वतः किंवा पोस्टने पाठविण्यात सांगण्यात आले होते ......
त्यानंतर दि .१० / ०४ / २०२० ला जाहिर केलेल्या सुचना क्र . GUG/Est/ 1377 / 2020 अनुसार लॉकडाऊनमुळे अर्ज करण्यास अडचण होत असल्यामुळे विद्यापिठाद्वारे निर्गमीत संकेत स्थळावर ऑनलाईन अर्ज दि .११ / ०५ / २०२० पर्यंत करण्यास सांगितले ...........
परंतु यानंतर दि . १३/०५/२०२० ला जाहिर केलेल्या सुचना क्र . GUG/Est/1537 / 2020 अनुसार ज्या उमेदवारानं ऑनलाईन अर्ज केले असेल अश्या उमेदवारांना उमेदवारी अर्जाचे ११ प्रत स्वत : किंवा पोस्टाने विद्यापिठात जमा करण्यास सांगितले .अन्यथा ते अर्ज ग्राहय धरण्यात येणार नाही ..........
दि .२५ / ०३ / २०२० पासुन देशामध्ये लॉकडाऊन जाहिर करण्यात आले असुन प्रामुख्याने महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे . या कोरोनाच्या संकटकाळात पदभरती घेण्याची नेमकी घाई का करण्यात येत आहे ? हे कळत नाही ...... 
साधारणतः ५०० च्या जवळपास अर्ज ऑनलाईन स्वरूपात आलेले आहे या ५०० उमदेवारांना त्यांच्या अर्जाची ११ प्रत विद्यापिठात स्वतः किंवा पोस्टाने पाठवणे विद्यापिठाणे अनिवार्य केले आहे . सध्याच्या या काळात हे शक्य नाही...........
गोंडवाना  विद्यापिठातील पि.एच.डी , शाखेमध्ये विद्यार्थ्यांचे शोधप्रबंध १५ ते २० महिन्यांपासुन प्रलंबित ठेवण्यात आले आहे . समजा कोणत्या कारणवश हे प्रलंबित ठेवण्यात आले असतील तर ते विद्यार्थ्यांना सांगण्याची मुभा नाही का ? आणी जर कोणते कारणच नसेल तर आतापर्यंत पात्र व्यक्तीस पि.डच.डी. पासून का बरं वंचित ठेवण्यात आले आहे ? आपल्यास विद्यापिठातील हे विद्यार्थी आपल्या विद्यापिठाच्या भोंगळ कारभारामुळे पदभरतीत पात्र होवु शकले नाही . ......
या विद्यार्थाची २-३ महिन्यात आवश्यक ते कार्यवाही करून पात्र व्यक्तीस पि.एच.डी. प्रदान करून नंतर ती पदभरती प्रक्रिया विद्यापिठाने राबवावी ..... अन्यथा गोंडवाना विद्यापिठाने आपल्याच विद्यार्थ्यावर अन्याय केला असं होईल लॉकडाऊनच्या काळात विद्यापिठाने पदभरती साठी केलेली लगीन घाई आणि विद्यार्थ्यांचे शोध प्रबंध प्रलंबित ठेवण्यामध्ये केलेल्या ढिसाळपणा यावरून या पदभरतीत काही घोळ तर नाही ना ही शंका निर्माण होते असल्याच
 भारतीय जनता युवा मोर्चा चे सुरज पेदुलवार, प्रज्वलंत कडू,अक्षय खांडेकर  ,मनोज पोतराजे,अभि वांढरे , कुणाल गुंडावार , संजय पटले यांनी निवेदनाद्वारे सांगितले आहे .......
या मागणी संदर्भातील निवेदन आ. सुधीर मुनगंटीवार यांना देण्‍यात आले असून आ. मुनगंटीवार यांनी यासंदर्भात राज्‍यपाल भगतसिंग कोश्‍यारी आणि उच्‍चशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्‍याशी पत्रव्‍यवहार व चर्चा केली आहे. या संदर्भात योग्‍य तोडगा काढण्‍याचे आश्‍वासन भाजयुमो पदाधिका-यांना दिले आहे.

Post a comment

0 Comments