Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

ब्रेकिंग चंद्रपूर : चंद्रपुरात पुन्हा एक कोरोना पॉसिटीव्ह रुग्ण !MH34UPDATE News/ चंद्रपूर
चंद्रपूर 20 मे :- जिल्ह्यातील ग्रामीण भागातही करोनाचा शिरकाव झाला असून आता पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या एकूण ३ झाली आहे. बुधवारी चंद्रपूर तालुक्यातील दुर्गापूर परिसरातील एक ५५ वर्षीय नागरिक करोना पॉझिटिव्ह निघाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांनी दिली आहे. दुर्गापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या दुर्गापुर परिसरात हैद्राबाद येथून १३ मे रोजी एक २३ वर्षीय युवती चंद्रपूर येथे परत आली. या युवतीला इस्टिट्यूशनल कॉरेन्टाइन (संस्थात्मक अलगीकरण) करण्यात आले होते. मात्र ही युवती कुटुंबाच्या संपर्कात आल्याच्या संशयावरून १८ मे रोजी कुटुंबातील मुलीसह सहाही सदस्यांचे स्वॅब नमुने घेण्यात आले.आज ६ पैकी ४ स्वॅब नमुन्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. या ४ अहवालात ५५ वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले आहे. हैद्राबादवरून आलेली मुलगी, आई, अडीच वर्षाच्या छोट्या मुलाचा अहवाल मात्र निगेटिव्ह आहे. या कुटुंबातील मुलीचा भाऊ व वहिनी या दोघांचे अहवाल प्रतीक्षेत आहे. ५५ वर्षीय पॉझिटीव्ह व्यक्तीमुळे आता चंद्रपूर येथे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३ झाली आहे. आज दुपारीच चंद्रपूर शहरांमध्ये कृष्ण नगर परिसरात २ मे रोजी पॉझिटिव्ह आढळलेला रुग्ण १४ दिवसांच्या कालावधीनंतर सलग २ तपासणी निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले. पहिला पॉझिटिव्ह रुग्ण करोना मुक्त झाल्याचे वृत्त आल्यानंतर लगेच काही वेळात दुर्गापुर मधील १ व्यक्ती पॉझिटिव्ह असल्याचे पुढे आले आहे. आत्तापर्यंत कृष्ण नगर येथील १ व बिनबा गेट परिसरातील १ युवती असे २ पॉझिटिव्ह रुग्ण शहरात होते. शहरालगतच्या दुर्गापूर भागांमध्ये आजचा रुग्ण आढळल्याने ग्रामीण भागातही पॉझिटिव्ह रुग्णाचा शिरकाव झाल्याचे पुढे आले आहे. दुर्गापूर परिसरातील ज्या भागात या रुग्णाचा रहिवास आहे. त्या भागाला प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले असून संपूर्ण परिसर रात्रीपासून सिल करण्यात आला आहे. कोरोना पॉझिटिव्ह ठरलेल्या ५५ वर्षीय नागरिकाचा गेल्या काही दिवसात आणखी कुठे संपर्क आला याचा शोध आता प्रशासन घेणार आहे.

Post a comment

0 Comments