वाघाचे नैसर्गिक रित्या स्थानांतरण व पुनर्वसन होऊ द्या - मनसे नगरसेवक सचिन भोयर यांची मागणीचंद्रपूर :- वाघांचा स्वर्ग म्हणून ताडोबा-अंधारी प्रकल्पाची ओळख संपूर्ण देशात तसेच जागतिक पातळीवर आहे. निसर्गाने मुक्त हस्ताने वनराई व पशु संपदेची देन चंद्रपूर जिल्ह्याला दिली आहे. म्हणूनच ताडोबा अंधारी प्रकल्प आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यटकांना आकर्षित करतो. इथे असलेली वाघांची संख्या इतर व्याघ्रप्रकल्प पेक्षा जास्त असल्यामुळे लाखोच्या संख्येने देशी-विदेशी पर्यटक ताडोबा-अंधारी प्रकल्पाला भेट देतात. त्याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यातील वन्य प्रेमींना ताडोबातील वनराई व व्याघ्र संपदे बद्दल नितांत जिव्हाळा आहे.पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर चंद्रपुरातील बेरोजगार युवकांना रोजगार मिळाला आहे. परिसरात हॉटेल, जिप्सी, गाईड ,तसेच इतर व्यवसायाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध झाले आहे. आजूबाजूचे गाव आत्मनिर्भर झाले आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या कमी झाल्यास पर्यटन व्यवसाय धोक्यात येऊ शकतो.
महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री माननीय संजय राठोड यांचेकडून वनखात्याला ताडोबा-अंधारी प्रकल्पातील 50 वाघ कृत्रिमरीत्या स्थानांतरित करा अशा सूचना मिळाल्याचे समजते. म्हणूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नगरसेवक सचिन भोयर यांनी वाघांचे नैसर्गिक रित्या स्थानांतर व पुनर्वसन होऊ द्या या मागणीचे पत्र केंद्रीय वनमंत्री भारत सरकार दिल्ली वन सचिव मंत्रालय मुंबई जैव विविधता मंडळ नागपुर (महाराष्ट्र राज्य) मुख्य वनसंरक्षक चंद्रपुर,संचालक ताडोबा अंधारी व्याग्र प्रकल्प,
जिल्हाधिकारी चंद्रपुर याना देण्यात आले. वाघांचे कृत्रिमरीत्या स्थानांतर केल्यास वाघांना उद्भवणार्‍या समस्या बाबत सरकारला व वन प्रशासनाला अवगत केले.
कृत्रिम रित्या स्थानांतरित केलेले वाघ हे त्या आवासात जगतच नाही हे वनविभागाला ज्ञात आहे.
स्थानांतरीत केलेल्या आवासात वाघ शिकार यांपासून सुरक्षित आहे का? त्या भागात मोठ्या प्रमाणावर वन्यपशू संपदा उपलब्ध आहे का?
बारमाही जलस्त्रोत वाघान करिता उपलब्ध आहे का?
स्थानांतरित केलेल्या भागातील आजूबाजूच्या ग्रामीण क्षेत्रात पाळीव पशु प्राण्यांना कोणत्या प्रकारचे लसीकरण केले जाते?
आदी प्रश्न अशा पाळीव प्राण्याची शिकार केल्यास वाघांना आजार होऊ शकतो .
आदी प्रश्न उपस्थीत करण्यात आले.
स्थानांतरित केलेल्या आवासातून मुळ आवासात परतीचा प्रवास वाघाने सुरू केल्यास वाघांचा अपघाती मृत्यू, वाघांचा आपसी संघर्ष,मानवी संघर्ष, मानव जीवितहानी, वाघांना उपासमार आदी सर्व समस्यांमुळे वाघांचा मृत्यू होऊ शकतो.वाघांचा प्रजनन दर कमी होऊ शकतो ,मृत्युदर वाढू शकतो, आदी सर्व कारणे लक्षात घेता ताडोबा-अंधारी प्रकल्पातील पन्नास वाघांचे कृत्रिमरीत्या स्थानांतर करू नका. वाघांचा जीव धोक्यात टाकू नका. मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सचिन भोयर यांनी दिले. वाघांचे स्थलांतर केल्यास वनविभाग कार्यालयावर तसेच जिल्हा कार्यालयावर वन्यप्रेमिंना सोबत घेऊन हल्ला बोल आंदोलन करू असा इशारा मनसे नगरसेवक सचिन भोयर यांनी दिला यावेळी शहर उपाध्यक्ष महेश वासलवार, ,मंगेश चौधरी आदी उपस्थित होते.


आजस आमच्याशी संपर्क करा


Post a comment

0 Comments