Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

पेरणीचा हंगाम तोंडावर आल्यामुळे शेतकर्‍यांना बियाण्यांसह आर्थिक मदत करा #rajuraराजुरा :- राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असताना या आपत्ती विरोधात लढण्यासाठी राज्यशासन प्रभावी उपाययोजना करू शकले नाही. संकटकालीन परिस्थिती हाताळण्यात सरकारला अपयश आले असून यामुळेच आज दुर्दैवाने महाराष्ट्रात रुग्णांच्या संख्येत व मृत्यूमध्येही देशात प्रथम क्रमांकावर आहे. केंद्र सरकारने नागरिकांना धान्य वाटप करण्याचे निर्देश दिले होते. ते देखील राज्य सरकारला वाटप करता आले नाही. मोफत धान्य देण्याचे निर्देश असताना त्याचेही पैसे घेण्यात आले. कोरोना विरुद्ध लढाईत कर्मचार्‍यांचा सांभाळ राज्य शासनाला करता आला नाही त्यामुळे हजारो पोलिसांना आजाराची लागण झाली. शेतकऱ्यांच्या, गरीब, मजूर यांच्याही अनेक समस्या अशा आहेत ज्यावर राज्य सरकार अजूनही प्रभावी उपाय शोधू शकले नाही.

या संकटकाळात सर्व जनता मोठ्या प्रमाणावर सहकार्य करत असतानाही राज्य सरकार निष्काळजीपणा करत आहे. याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी हे निवेदन देण्यात आले आहे.

राजुरा विधानसभा क्षेत्रातील मान्यवराचे उपस्थित मा.उपविभागीय अधिकारी राजुरा याना भारतीय जनता पक्षाचे वतीने निवेदन देण्यात आले यात covid 19 च्या जागतिक संकटात राज्य सरकारने शेतकऱ्यांना पाँकेज जाहीर करावे अशी विनंती करण्यात आली आहे. दुर्दैवाने महाराष्ट्र मध्ये कोरोणाचे रुग्ण जास्त प्रमाणात होत असून यावर त्वरित उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे सांगितले आहे. वास्तविक बघता बरेच विद्यार्थी विद्यार्थी नी बाहेर शिक्षणासाठी शहरी भागात गेलेले आहेत त्याना स्वगावी परत आणण्यासाठी बसेस मोफत दरात उपलब्ध करून द्यावीत.शेतकरी बाधवाचे कापसाला खरेदी करण्यास विंलब होत असल्याने शेतकऱ्यांना त्रास सहण करावा लागत आहे. त्वरित सि.सि.आय कापूस खरेदी जादा गतिने खरेदी करुन शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.व खाजगी उद्योजक कापूस खरेदी करण्यासाठी मुल्यदर आकारुण मापक दरात कापूस खरेदी ला सुरुवात करावी. शेतकऱ्यांना कर्ज माफी चा लाभ अजूनही मिळालेला नाही तो त्वरित द्यावा.आरोग्य व्यवस्था सुधारणे गरजेचे आहेत अजूनही या कोरोणाचे संकटात डॉक्टराना व पोलिसांना सुरक्षा किट मिळत नसल्याची बाब समोर येत आहे. विलिनीकरण कक्षात असलेल्या बांधवांना मुलभूत सुविधा उपलब्ध. होत नसल्याचे सांगितले जात आहे. या सर्व बाबींचा समावेश करुन त्वरित या समस्या चे निवारण करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. आजच्या सद्यस्थितीत कोरोणाचे संकटात सापडलेल्या नागरिकांना योग्य प्रकारे सहकार्य करावे. नाहीत विदारक चित्र समोर उभे राहील करिता राज्य सरकारने सबधीत बाबची दखल घ्यावीत म्हणून स्थानिक स्तरावर तालुका चे ठिकाणी प्रमुख मागण्या चे निवेदन सादर केले आहे.
महाराष्‍ट्रात कोविड-19 महामारीच्‍या अनुषंगाने अनेक समस्‍या उदभवलेल्‍या आहेत. महाराष्‍ट्रात कोरोनाच्‍या रूग्‍णांची संख्‍या दिवसेंदिवस वाढत आहे. लॉकडाऊनमुळे शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब नागरिक, मध्‍यमवर्गीय, व्‍यापारी सर्वच घटकांना समस्‍यांचा सामना करावा लागत आहे. या समस्‍येवर मात करण्‍याच्‍या दृष्‍टीने विविध उपाययोजना करण्‍याची मागणी या शिष्‍टमंडळाने उपविभागीय अधिकारी राजुरा-यांच्‍या माध्‍यमातुन मुख्‍यमंत्री उध्‍दव ठाकरे यांच्‍याकडे केली आहे.
सदर मागण्‍यांबाबत तातडीने शासनाला अवगत करण्‍यात येईल असे उपविभागीय अधिकारी राजुरा यांनी शिष्‍टमंडळाला सांगितले.या शिष्‍यमंडळात मा.श्री.अरुण मस्की जी जिल्हा उपाध्यक्ष भाजपा चंद्रपूर , स्वाती देशपांडे जिल्हा उपाध्यक्ष महिला आघाडी भाजपा ,चंद्रपूर मा.सतिश धोटे संनियो अध्यक्ष राजुरा ,दिलिप वाढरे तालुका मंहामंत्री भाजपा राजुरा , सुरेश भाऊ रागिट भाजपा शहर ,गणेश भाऊ रेकलवार भाजपा शहर ,सुरेशभाऊ धोटे भाजपा नेते , सदिप पारखी उपाध्यक्ष ओबीसी भाजपा ,व ईतर मान्यवर यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies