Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अखेर प्राध्यापक भरती स्थगितीची कुलगुरूंना सूचना


- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घेतली दखल

- शिक्षण मंचच्या सिनेट सदस्यांनी व भाजपा युवामोर्चा पदाधिकारी यांनी मुनगंटीवारांकडे केली होती मागणी
चंद्रपूर,


चंद्रपूर :- गोंडवाना विद्यापीठातील प्राध्यापक भरतीच्या विशेष बाबीला परवानगी न देता, त्यास स्थगिती द्यावी, असे निवेदन सिनेट सदस्यांनी व भाजयुमो पदाधिकारी यांनी राज्याचे माजी अर्थमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांना दिले होते. याबाबत मुनगंटीवारांशी चर्चा करताना, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री सामंत यांनी स्थगितीचे आश्वासन दिले होते. अखेर सोमवार, 25 मे रोजी सामंत यांनी, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर यांना भरतीच्या स्थगितीची सूचना दिल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.टाळेबंदीच्या काळात गोंडवाना विद्यापीठाने राबवलेली प्राध्यापक भरती प्रक्रिया स्थगित करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन २१ मे रोजी गुरूवारी भाजयुमोचे पदाधिकारी सुरज पेदुलवार प्रज्वलन्त कडू ,मनोज पोतराजे, अभि वांढरे, कुणाल गुंडावर, अक्षय खांडेकर, संजय पटले,हिमांशु गादेवार,प्रविण उरकुडे,रोहीत भिसेकर यांनी राज्याचे माजी अर्थमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांना दिले होते.
यांच अनुशंगाने २४ मे रविवार ला गोंडवाना विद्यापीठ शिक्षण मंच तथा अभाविपचे सिनेट सदस्य तथा विद्या परिषद सदस्य संदीप पोशट्टीवार, व्यवस्थापन परिषद सदस्य पराग धनकर, सिनेट सदस्य प्रशांत दोंतुलवार, संजय रामगिरवार, मनिष पांडे, डॉ. परमानंद बावनकुळे यांनी सुद्धा मागणी केली
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, राज्यातील सर्व महाविद्यालये 16 मार्चपासून बंद झालेली आहेत. 22 मार्चच्या जनता संचारबंदीनंतर देशभरात टाळेबंदीच्या हालचाली सुरू असताना गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाने प्राध्यापक पदांसाठी अर्ज मागवले. पुढे काही दिवसांनी ही प्रक्रिया ऑनलाईन करण्याविषयी निर्देश वेबसाईट वरून दिले. ही संपूर्ण भरती प्रक्रिया टाळेबंदीच्या काळातच सुरू झाली आणि संपलीदेखील आहे. सहाय्यक प्राध्यापक ते प्राध्यापक या पदासाठी ऑनलाईन अर्ज करायला उमेदवारांकडे प्रत्येक शैक्षणिक प्रमाणपत्रांची ‘सॉफ्ट कॉफी’ उपलब्ध असणे आवश्यक आहे. यासोबतच 20 मार्चला जाहिरात आल्यावर एक महिना अवधी असल्यामुळे क्रित्येक जण अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्याआधी टाळेबंदी सुरू झाली. या काळात अनेक जण आपल्या रहिवासापासून किंवा कामाच्या स्थानापासून दूर अडकून पडले होते.
संपूर्ण देशातून ज्यांनी ऑनलाइन अर्ज भरले. त्यांना स्वतःच्या ठिकाणी अर्जाची प्रिंट आणि इतर सोयी खुल्या असतीलच, हे शक्य नाही. अनेक उमेदवार हे रेड झोनमध्ये असतील. सार्वजनिक वाहतूक सेवा सुरळीत सुरू झालेली नाही. त्यामुळे पोस्ट सेवा देखील खंडित आहे. जिथे पोस्टल सेवा सुरू आहे. त्यापैकी अनेक ठिकाणी अत्यावश्यक वस्तूंचेच पोस्टेज स्वीकारल्या जात आहे. अशा स्थितीत या सर्व उमेदवारांना आपल्या अर्ज व कागदपत्रांची प्रिंट व 11 कॉपीचा संच करणे व विद्यापीठाला पोचवणे ही संधी देणे आवश्यक आहे. विद्यापीठाने देशातील सर्व उमेदवारांचा विचार करणे अपेक्षित आहे.
अनेक इच्छुक उमेदवार हे आपल्या घरापासून लांब इतर जिल्ह्यात अडकून पडले असतील. जवळ असेल्याा सॉफ्ट कॉपी प्रमाणपत्रांच्या सोबत ऑनलाइन अर्ज जरी केला असेल तरी अनेकांना आपला एम्लायरची स्वाक्षरी घेणे शक्य नाही. अशा अनेक अडचणी असतानादेखील विद्यापीठ ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्याची घाई अशा अभूतपूर्व महामारीच्या काळात करत आहे, हे आर्श्चकारक आहे. या सर्व बाबी लक्षात घेता आमची ही विनंती आहे की, भरती प्रक्रिया संपूर्ण देशातून टाळेबंदी उठेपर्यंत स्थगित करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली होती.

Post a comment

0 Comments