Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

सरसकट कापूस खरेदी न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल
राजुरा :- महाराष्ट्रात व्यापारी केंद्र सरकारच्या हमी भावानुसार कापूस खरेदी न करता शेतकऱ्यांची लूट करत असल्याने सीसीआय द्वारे खरेदी कापूस केला जातो यावर कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे नियंत्रण ठेवले जाते परंतु काही कृषि उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी शेतकऱ्यांची अडवणूक करीत होते टोकन पद्धतीशिवाय कापूस खरेदी केला जात नव्हता टोकन करिता अडवणूक करून पैसे वसुलीचा आरोप होत होता काही ठिकाणी अडत्यांचा कापूस खरेदीला प्राधान्य दिले जात होते प्रत्येक गाडीमागे ग्रेडर पैशाची मागणी करीत होते आज जवळपास ७० गाडी कापूस शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर आणला असता खरेदी बंद असल्याच्या सुचना देण्यात आल्या जीव घेण्यात उन्हात शेतकऱ्यांच्या हालअपेष्टा होत होत्या बाजार समितीची अडवणूक कूपन प्रणाली यामुळे शेतकर्‍यांचा संयम सुटल्याने युवा शेतकऱ्यांनी सकाळी १० वाजता चंद्रपूर आदिलाबाद राज्यमार्ग रोखून धरून चक्काजाम आंदोलन सुरू केले दोन तास शेतकरी उन्हात आंदोलन करीत होता अखेर उपविभागीय पोलीस अधिकारी गडचांदूर विलास यामावर यांनी सोनुर्ली जवळील आंदोलन स्थळ गाठून शेतकरी व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय घडवून आणण्याचा प्रयत्न केला शेतकऱ्यांचे कैवारी नेते व शेतकऱ्यांमध्ये मोठी बाचाबाची झाली शेतकरी कूपन पद्धत बंद करण्याची मागणी करीत होते परंतु शेतकरी नेते मी कोर्टात केसेस केल्या आहे असे आश्वासन देत होते अखेर शेतकर्‍यांनी या नेत्याला बाजू सारत मोठा विरोध केला अखेर शेतकऱ्यांच्या दबावाखाली बाजार समितीच्या पदाधिकार्‍यांना टोकण पद्धती बाजूला ठेवून आज आलेल्या सर्व शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्याचे आश्वासन दयावे लागले शेतकऱ्यांनी चंद्रपूर आदिलाबाद राज्यमार्ग आवाजाहीसाठी खुला करून दिला सीसीआय द्वारे आज तात्पुरता दिलासा देत विना कूपन आज आलेल्या सर्व शेतकऱ्यांचा जवळपास ७० गाडी कापूस खरेदी केला येत्या दोन दिवसांत टोकण पद्धती बंद करून सरसकट कापूस खरेदी करण्याची मागणी सय्यद अाबिद अली , आशीष देरकर , शैलेश लोखंडे , गणेश लोन्ढे , महेश राऊत , गणेश तुराणकर , शुभकांत शेरकी , अभय मुनोत देवेंद्र घाटे यांनी केली आहेत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांची अडवणुकीचे धोरण बंद करुन होणारी लूट थांबवावी अन्यथा येत्या सोमवारी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून मोठ्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे जोपर्यंत कोरपणा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचा कापूस सरसकट खरेदी केला जात नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नसल्याची संतप्त प्रतिक्रिया जन सत्याग्रह संघटनेचे अध्यक्ष आबिद अली यांनी दिली आहे जिल्हा उपनिबंधक व जिल्हाधिकारी यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भोंगळ कारभार बंद करून कापूस उत्पादक शेतकर्‍यांना न्याय देणे गरजेचे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies