Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

राजुरा येथे आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण



चंद्रपूर जिल्ह्यामध्ये राजुरा येथील एक 27 वर्षाचा युवकाचा वैद्यकीय अहवाल रविवारी ३१ मे रोजी रात्री उशिरा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार रात्री आलेल्या नमुन्यांच्या अहवालात 27 वर्षाच्या युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे.


मुंबईतील गोरेगाव फिल्मसिटी येथून हा युवक 25 मे रोजी विमानाने नागपूरला आला होता. नागपूर ,चंद्रपूर, राजुरा प्रवास केल्यानंतर त्याला 25 रोजी राजुरा येथे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले होते. त्याला ३० तारखेला लक्षणे दिसून आली. ३० ला त्याचा स्वॅब नमुना घेण्यात आला. ३१ ला रात्री या युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्याला चंद्रपूर येथील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे.


चंद्रपूरमध्ये २ मे ( एक रुग्ण ), १३ मे ( एक रूग्ण) २० मे ( एकूण १० रूग्ण ) २३ मे ( एकूण ७ रूग्ण ) व २४ मे ( एकूण रूग्ण २ ) २५ मे ( एक रूग्ण ) ३१ मे ( एक रुग्ण ) अशा प्रकारे जिल्हयातील रुग्ण २३ झाले आहेत.आता पर्यत १२ रुग्णांना बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे २३ पैकी अॅक्टीव्ह रुग्णाची संख्या ११ आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies