कोल इंडियाच्या खाणी खाजगी क्षेत्राला देण्याचा निर्णय योग्य - हंसराज अहिरचंद्रपूर 16 मे ( MH34UPDATENews):- देशात कोळशाचा प्रचंड साठा असतांना उत्पादन वाढीसाठी 50 हजार कोटी रुपये देऊन सरकाचा सार्वजनिक उपक्रम असलेल्या कोल इंडीयाला प्रोत्साहन देणे जरूरी होते. उत्पादन वाढीसोबतच काही प्रमाणात आयातीत कोळश्यावर यामुळे नियंत्रण होऊन देशाच्या परकिय चलनात बचत होईल. याशिवाय मोठ्या प्रमाणात रोजगार वाढतील असे सांगत नविन कोळश्याच्या 50 खाणींचा लिलाव होणार सोबतच कोल इंडीयाच्या अधिकारातील खाणी खाजगी क्षेत्राला देण्याचा घेतलेला निर्णय आजच्या स्थितीत योग्य असल्याचे माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांनी सांगीतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनमुळे कुप्रभाव पडलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी भारत आत्मनिर्भर योजना अंतर्गत 20 लाख कोटी रुपयाचे पॅकेज घोषीत केले होते त्याअंतर्गत अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी कोळसा उत्पादन वाढीकरीता केलेल्या विविध घोषणा स्वागतार्ह असल्याचे सांगत अहीर यांनी प्रतीक्रिया व्यक्त केली.

Post a comment

0 Comments