Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

बाहेर गावून आलेल्या कॉरोनटाईन नागरिकांची पोटभर जेवनाची सोय करा- युवासेना
चंद्रपूर/MH34UPDATENEWS :-
कोरोना महामारीमुळे संपूर्ण देश संकटात आलेला आहे यावेळेत नुकत्याच महाराष्ट्र सरकार च्या आदेशाने आपल्या शहराच्या बाहेर अडकून पडलेल्या नागरिकांना स्थलांतरित करून त्यान्च्या मूळ गावी, शहारत विविध ठिकाणी योग्य ती सोय करून 14दिवस कॉरोनटाईन करून ठेवण्यात आलेले आहे.या महामारी काळात प्रशासन उत्तम रित्या सोई सुविधा पोहोचवून त्यांची देखभाल करीत आहेत त्याबद्दल त्यांच कार्य प्रशंसनीय आहे परंतु यामध्ये त्यान्च्या दोन वेळच्या जेवणामध्ये अत्यन्त कमी प्रमाणात म्हणजे 3-4पोळी, थोडी भाजी, थोडासा भात त्यांना मिळत असून त्यांना पूर्ण पोटभर जेवणापासून वंचित राहावं लागत आहे. पहिलेच कोरोना प्रादुर्भावाची भीतीने त्याहून घराबाहेर राहावं लागत असल्यामूळे त्यान्ची मनस्थिती काय असेल आपण समजू शकतो अश्या परीस्थितीत 2वेळच पोटभर जेवण न मिळाल्यामुळे उपाश्या पोटी झोप सुद्धा त्यांना येन कठीण जात आहे. अश्या प्रकारच्या तक्रारीचे आणि आपल्याला युवासेनेच सहकार्य मिळेल या आशेने चंद्रपूर युवासेना जिल्हा समन्वयक निलेश बेलखेडे यांना इ-मेल,कॉल च्या माध्यमातून आलेल्या आहेत करिता आज युवासेना,चंद्रपूर च्या वतीने शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनात आणि इंजि. निलेश बेलखेडे यांच्या नेतृत्वात युवा सेना शिष्टमंडळाने मा. आयुक्त साहेब,महानगर पालिका महापौर मॅडम यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले व यावेळीं कॉरोनटाईन केलेल्या सर्व नागरीकांच्या या समस्या जाणून योग्य तसे निर्देश देऊन जेवणामध्ये पोळी, भाजी, भात यांच प्रमाण वाढवून त्यांच्या2 वेळ च्या पोटभर भोजनाची सोय करावी हि विनंती करण्यात आली. यावेळीं                   इंजि.निलेश र. बेलखेडे, युवासेना जिल्हा समन्वयक, विक्रांत सहारे,युवासेना  शहर प्रमुख अक्षय अंबिरवार, उपशहर प्रमुख करण वैरागडे इत्यादी. पदाधिकारी,  कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Post a comment

0 Comments