Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

पाणी पूरवठा नियमीत करा आमदार किशोर जोरगेवार यांच्या मनपा आयुक्तांना सुचनापाणी पूरवठा सुरळीत होत नसल्याने आ. जोरगेवार यांनी घेतली मनपा अधिका-यांशी बैठक

चंद्रपूर शहरात नियमीत पाणी पूरवठा होत नसल्याने भर उन्हात नागरिकांची पाण्यासाठी पायपीठ होत आहे. नागरिक नियमीत पाणी कर अदा करत असतांना त्यांना मुलबक पाणी पूरवठा करण्याची महानगरपालिकेची जबाबदारी आहे. इरई धरणात मुबलक पाणी साठा असतांनाही नागरिकांना नियमीत पाणी पूरवठा केल्या जात नसेल तर हा अन्याय असल्याचे सांगत शहरातील पाणी पूरवठा सुरळीत करण्याच्या सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा आयुक्त राजेश मोहिते यांना दिल्यात. चंद्रपूर शहरातील पाणी पूरवठा विस्कळीत झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याची दखल घेता आज मंगळवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी महानगरपालिकेच्या दालनात मनपा अधिका-यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत आ. जोरगेवार यांनी मनपा आयुक्तांना विविध सुचना दिल्यात. या बैठकीला मनपा आयुक्त राजेश मोहिते, कार्यकारी अभियंता महेश बारई तसेच पाणी पूरवठा संबधित अधिका-यांशी या बैठकीला उपस्थिती होती.

उन्हाळ्यात नागरिकांची पाण्यासाठी पायपीठ होते हा चंद्रपूरकरांचा आजवरचा अनूभव राहिला आहे. हिच परिस्थिती यंदाही उद्भवली आहे. इरई धरणात मुबलक पाणी साठा असतांनाही चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने नियमीत पाणी पूरवठा केल्या जात नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. संपुर्ण शहरात एक ते दोन दिवसाआड पाणी पुरवठा केल्या जात आहे. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांचे भयंकर हाल सुरु आहे. या पार्श्वभूमीवर आज आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा अधिकाऱ्याची बैठक घेतली. या बैठकीत परकोटा बाहेर पाणी पूरवठा यंत्रणा काम करत नसल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी आयुक्तांच्या लक्षात आणून दिले. शहरातील बाबूपेठ, भिवापूर, टाँवर टेकडी, बालाजी वार्ड, टिचर कॉलनी, वडगाव या भागात पाण्याची भिषण समस्या आहे. याकडे लक्ष देण्याच्या सुचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा आयूक्तांना केल्यात. ज्या भागात नळाचे पाणी पोहचत नाही त्या भागात तात्पुरत्या स्वरुपाच्या पाण्याच्या टाक्या लावाव्यात अशा सुचनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी दिल्यात. ज्या ठिकाणी अशा स्वरुपाच्या टाक्या लावण्यात आलेल्या आहेत त्या टाक्यांमध्ये नियमीत पाणी भरल्या जात नाही याकडे लक्ष देण्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा अधिका-यांना सांगीतले. तसेच पाणी टॅंकरच्या माध्यमातूनही शहरातील दुर्गम भागात पाणी नियमीत पोहचविण्याच्या सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी दिल्यात. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी अमृत कलश योजनेतील कामांचाही आढावा घेत या योजनेचे काम जलत गतीने करण्याच्या सूचना मनपा आयुक्तांना दिल्यात. अमृत कलश योजनच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या मार्गांची डागडूजी करण्याच्या सुचनाही या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिका-यांना दिल्यात. उन्हाळा आता संपत आला आहे. मात्र या शेवटच्या दिवसांमध्ये नियोजनात्मक काम करत नागरिकांना मुबलक पाणी पूरवठा करण्याच्या दिशेने जलद गतीने काम करण्याचे निर्देश यावेळी मनपा आयुक्तांना आ. किशोर जोरगेवार यांनी दिलेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies