जिल्हा व राज्याबाहेरून येणाऱ्यांनी नियम पाळावे - मनपाचंद्रपूर 16 मे (MH34UPDATENews)- लॉकडाउनमुळे अडकलेले नागरिक आता आपापल्या गावी दाखल होऊ लागले आहेत. चंद्रपूर शहरातही येत्या काळात बाहेर जिल्हा, राज्यातील अनेकजण येण्याची शक्यता आहे. मोठ्या संख्येने येणाऱ्या या नागरिकांचे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन करणे शक्य नाही. त्यामुळे त्यांचे होम क्वारंटाइन करून घरावर क्वारंटाइनचा शिक्का मारण्यात येणार आहे. याकाळात अनेकजण बेफिकिरीने फिरण्याचे प्रकार घडू शकतात, त्यामुळे या होम क्वारंटाइन करण्यात आलेल्या नागरिकांवर 'वॉच' ठेवण्याचे काम आता मोहल्ला सुरक्षा समिती करणार आहे.

देशासह संपूर्ण जगावर करोनाचे संकट आढळले आहे व विषाणूच्या प्रतिबंधासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे.
त्यामुळे शिक्षण कामासाठी गेलेले हजारो नागरिक अडकून पडले आहेत. करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन केंद्र सरकार राज्य शासन लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्याच्या मानसिकतेत आहे. याआधी अडकलेल्या नागरिकांना आपल्या गावी जाण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. करोनाच्या पहिल्या टप्प्यात एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात काही नागरिक जिल्ह्यात आलेत. महानगरपालिका प्रशासनाने या सर्व नागरिकांना होम क्वारटाईन केले असून चौदा दिवसांचा कालावधी देखील पूर्ण झाला आहे. आता करोनाच्या दुसऱ्या टप्प्यात चंद्रपूर शहरातील बाहेर जिल्हा राज्यातील नागरिक येणार आहेत ही संख्या हजारोंच्या घरात राहणार आहे त्यामुळे हजारो नागरिकांचे इन्स्टिट्यूशन क्वरांटाईन करणे शक्य नाही त्यामुळे या सर्व नागरिकांना होम क्वरांटाईन करायचा निर्णय घेतला आहे या नागरिकांनी होम क्वरांटाईन काळात प्रशासनाच्या सूचनांचे पालन केले करणे बंधनकारक आहे.

बाहेरून येणाऱ्या नागरिकांच्या माध्यमातून संसर्ग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, अनेक जण बेफिकिरीने शहरात फिरतात. यातून शहरात करणाच्या संसर्ग होण्यासाठी भीती वाढू शकते. त्यामुळे व नागरिकांच्या घरांवर होम क्वरांटाईन शिक्का मारण्यात येईल. त्यासोबतच कोणीही घराबाहेर पडू नये म्हणून मोहल्ला सुरक्षा समिती नजर ठेवून राहणार आहेत. यानंतरही घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर दंड आकारून इन्स्टिट्यूशनल होम क्वरांटाईन केले जाणार आहे. मोहल्ला सुरक्षा समिती होम क्वरांटाईन करण्यात आलेल्या नागरिकांवर वॉच ठेवणार आहेत या समितीत प्रभागाचे नगरसेवक मनपाचे अधिकारी कर्मचारी मोहल्ल्यातील सामाजीक कार्यकर्ते यांचा समावेश राहणार आहे तसेच पोलीस विभागाचा समन्वय राहणार आहे. होम क्वारांटाईन करण्यात आलेल्या नागरिकांनी घराबाहेर

Post a comment

1 Comments