लॉकडॉऊनमध्ये मोदी सरकारच्या 'या' योजनेच्या घ्या फायदा, व्यवसायासाठी सवलतीच्या दरात मिळेल लोन
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी मोदी सरकारने 31 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. या बरोबरच सरकारने काही नियम व अटीच्या आधारे व्यवसाय सुरु करण्याची परवानगी दिली आहे. कोरोनाच्या अशा परिस्थितीत ही तुमच्या मनात व्यवसाय सुरु करण्याचा विचार आला असेल तर पैश्यांसाठी परेशान होण्याची गरज नाही. मोदी सरकारची मुद्रा लोन ही योजना तुमच्या कामी येऊ शकते. दरम्यान सरकारने दोन टक्के दराने शिशु मुद्रा लोनची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी केली आहे. चला तर मग जाणून घेऊया या योजनेचा फायदा.

2 टक्के दराने व्याज दर

अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी 20 लाख कोटी रुपयाच्या पॅकेजमध्ये प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेची मोठी घोषणा केली आहे.
मुद्रा लोनवर 2 टक्के दराने लोन दिलं जाईल असं स्पष्ट करण्यात आलं आहे. शिशु मुद्रा लोन योजनेत 50 हजार रुपयापर्यंत लोन दिलं जाणार आहे. जर तुम्हाला एखादा छोटासा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही योजना फायदेशीर ठरु शकते. दरम्यान सध्या शिशु मुद्रा लोनवर जवळ-जवळ 10 ते 11 टक्के दराने बॅंका लोन देतात. सरकारकडून ही सवलत 12 महिन्यांपर्यंत दिली जाणार आहे. या योजनेचा फायदा तीन कोटी लोकांना मिळणार आहे.

तीन प्रकारचे लोन मिळते

प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गंत तीन प्रकारचे लोन दिले जाते. शिशु मुद्रा लोन, किशोर मुद्रा लोन, आणि तरुण मुद्रा लोन. शिशु मुद्रा लोन हे छोट्या व्यवासायिकांना दिले जाते. यामध्ये 50 हजार रुपये लोन दिलं जातं. किशोर मुद्रा लोन हे 50 हजार ते 5 लाख रुपयांपर्यंत दिले जाते. तरुण मुद्रा लोन हे 5 लाख ते 10 लाखांपर्यंत दिलं जातं.

असे करा अप्लाय

मुद्रा लोन योजनेचा फायदा घेण्यासाठी आपल्या व्यवसायचे प्रॉजेक्ट रिपोर्ट आणि इतर कागदपत्रे घेऊन जवळच्या बॅंकेत जा. बॅंकेकडून तुम्हाला तुमच्या व्यवसायबद्दल माहिती विचारली जाईल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या आधारे लोन दिले जाईल.या योजनेत बिना गॅंरटी सहज लोन मिळेल.

Post a comment

0 Comments