पाहिल्यांद्याच चंद्रपूर मध्ये फिटनेस एक्सपर्ट द्वारे आयोजित ऑनलाइन बॉडी फिटनेस स्पर्धा
चंद्रपूर :- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे 22 मार्च पासून सतत लोकडाऊन वाढत चालले आहे. त्यामुळे सर्व काही बंद आहे. त्यामध्ये जिम व्यायामशाळा सुद्धा बंद आहेत. म्हणूनच फिटनेस एक्स्पर्ट द्वारे ऑनलाइन बॉडी फिटनेस स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये आपले भारतीय बॉडी बिल्डर किती फिटनेस ठेवु शकतात, हे तपासण्याकरिता ही स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये सर्व बॉडी बिल्डरना स्वतःचा एक मिनिटाचा विडिओ पाठवायचा होता. या स्पर्धेमध्ये अनेक बॉडी बिल्डरचा भरपूर प्रमाणात प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेमध्ये विजेते म्हणून जय खरात (धुळे) तर उपविजेते म्हणून किरण ठाकरे (चंद्रपुर) यांची निवड करण्यात आली.या स्पर्धेमध्ये फिटनेस एक्सपर्ट मंडळी नि अतिशय मेहनत घेतली त्यामध्ये सुशील पटले, हर्षद कानमपल्लीवार, पिंटू धिरडे, सौरभ धिरडे, शुभम गोविंदवार यांचा सहभाग आहे. ही स्पर्धा बॉडी बिल्डर च्या प्रोत्साहनासाठीच नव्हे, तर आम्ही भारतीय कोरोना विरुद्धच्या लढा लढण्यात सक्षम आहोत, ही ऊर्जा निर्माण करण्यासाठी घेण्यात आली होती.

Post a comment

0 Comments