Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

श्रिमंतयोगी जगदंब निःस्वार्थ सेवा फाऊंडेशन तर्फे रक्तदान शिबीर संपन्न
चंद्रपूर :- श्रिमंतयोगी जगदंब निःस्वार्थ सेवा फाऊंडेशन मिञ परिवार च्या वतीने तसेच स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या जयंती निमित्त, देशात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाने पडलेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेता दि. 28:05:2020 रक्तदान महादान हा कार्यक्रम श्रींमत योगी जगदंब निःस्वार्थ सेवा फौंडेशन च्या वतीने आयोजित केला गेला. या कार्यक्रमात भारतीय जनता युवा मोर्चा चे युवा नेते मोहन भैय्या चौधरी यांनी आपली उपस्थिती दर्शवून रक्तदान केले. त्याचबरोबर डॉक्टर रिमांशू तावाडे सर यांनी देखील या रक्तदान महादान उपक्रमात आपला सहभाग नोंदवून त्यांनी देखील स्वइच्छेनी रक्तदान करून आपली भागी दारीं दर्शवली. तसेच रक्तदान सेवा फौंडेशन चे संस्थापक आणि रक्तदुत म्हणून ओळखले जाणारे हकीम भाई हुसेन यांनी देखील या कार्यक्रमात आपली उपस्थिती होते.श्रींमत योगी जगदंब निःस्वार्थ सेवा फाउंडेशन चे सक्रिय सदस्य उमेश चंदनखेडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमात श्रिमंतयोगी जगदंब निःस्वार्थ सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष सचिन संदूरकर व सदस्य अंकित जोगी,मनीष जाधव बळीराम शिंदे,केवल तारपे,दिपक मोगरे,कमलाकर कुलमेथे,प्रवीण तुडसकर ,विनोद धोंडी.महेश फालके.विठ्ठल उगेमुगे,चेतन राऊत,सचिन पिसे,मोनू रामटेके, यांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला सर्व उपस्थित मान्यवरांचे तसेच सर्व रक्तदात्यांचे मनस्वी आभार व्यक्त करत हा कार्यक्रम पार पडला.

Post a comment

0 Comments