स्वखर्चातून आ.सुधीरभाऊ मूनगंटीवार यांचा मार्फत पाठविल्या होत्या २ खासगी बसेस
चंद्रपुर (प्रतीनीधी) : संचारबंदी मध्ये चंद्रपूर नजीक असलेल्या वर्धा व गडचिरोली जिल्ह्यतील प्रवाशांना मा.आ.सुधीरभाऊ मूनगंटीवार यांच्या पुढाकारातून स्वजिल्ह्यात आणण्यात आले. वर्धा व गडचिरोली येथे अडकलेल्या विद्यार्थी, कामगार, व इतर नागरिकांना चंद्रपूर येथे आणण्याकरिता दोन ट्रॅव्हल्स पाठविण्यात आल्या व अडकलेल्या या आपल्या जनतेला आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी स्वजिल्ह्यात परत आणले.
यावेळी उपमहापौर तथा स्थायी समिती अध्यक्ष राहुलभाऊ पावडे, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ब्रिजभूषण पाझारे ,जेष्ठ नेते डॉ. मंगेशजी गुलवाडे,मा. दत्तप्रसंना महादानी , मा.प्रकाश धारने,भाजयुमोचे सूरज पेदुलवार, प्रज्वलन्त कडू ,आदित्य डवरे, सत्यम गाणार, अक्षय शेंडे यांची उपस्थिती होती.

वर्धा व गडचिरोली जिल्ह्यातून आलेल्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी झालेली असून त्यांना गृह अलगीकरणात करण्यात आलेले आहे