चंद्रपूर शहरात दुसरा पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्याने चंद्रपूर शहरात जमावबंदी लागू लॉकडाऊन कायम
देशावर सद्यस्थीतीत कोरोनाचे संकट ओढावले आहे. या कोरोनाच्या संकटाला संपूर्ण जग सामोरे जात आहे. या स्थितीत महाराष्ट्र राज्य अंतर्गत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दि 12 मे ला चंद्रपूरात दुसरा कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळल्याने चंद्रपुरात खळबळ माजली आहे. कोरोनाचे हे संकट लक्षात घेऊन चंद्रपुर जिल्हाधिकारी यांनी चंद्रपूरची काढलेली संचारबंदी पुन्हा लागू केली आहे. ज्या अर्थी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तसेच चंद्रपुर शहर व संपूर्ण चंद्रपुर तालुक्यात जीवनावश्यक वस्तू विक्री व वितरण इ. दुकाने या व्यतिरीक्त सर्व प्रकारची दुकाने सुरू झाल्यामुळे नागरिकांची गर्दी वाढली होती. चंद्रपूर चा दुसरा रुग्ण आढळल्यामुळे चंद्रपूरची स्थिती सावरण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी पुन्हा संचारबंदीचा निर्णय घेतला आहे.

जाणून घ्या नवीन नियमजिल्हा दंडाधिकारी चंद्रपूर यांच्या आदेशान्वये फौजदारी प्रक्रिया संहिता 19731974 चे 2) चे कलम 144 चे अन्वये जिल्हयात दिनांक 11 मे, 2020 पासून ते 17 मे, 2020 पर्यंत लॉकडाऊन मध्ये सुरु असणाऱ्या आस्थापना बाबत निर्गमित करण्यात आलेले आहे.

याद्वारे सुधारीत वेळ जिवनावश्यक खाद्य पदार्थ, किराणा, दुध, दुग्धजन्य पदार्थ विक्री व वाहतुक, ब्रेड, फळे, भाजीपाला, अंडी, मांस, मासे, बेकरी, पशु खाद्य यांची किरकोळ विक्री सकाळी 07.00 ते दुपारी 05.00 वाजेपर्यंत सुरु राहतील.

परंतु दुकान/आस्थापना समोर आणि फुटपाथवर कोणत्याही प्रकारचे साहित्य ठेवता येणार नाही.


तसेच जिवनाश्यक वस्तु विक्री व वितरण इ. आस्थापना/दुकाने या व्यतिरिक्त इतर सर्व प्रकारची आस्थापना/दुकाने (सदर आदेशामधील प्रतिबंधात्मक बाबीमधील मध्ये नमुद असलेली आस्थापना/दुकाने सोडून) सोमवार ते शनिवार या दिवशी सकाळी 10.00 ते दुपारी 05.00 या वेळेत सुरु राहतील व रविवार ला सदर दुकाने पूर्णतः बंद राहतील.

परंतु दुकान/आस्थापना समोर आणि फुटपाथ्वर कोणत्याही प्रकारचे साहित्य ठेवता येणार नाही.संदर्भीय आदेशातील इतर सर्व अटी व शर्ती कायम राहतील.

सदरचा आदेश संपुर्ण जिल्हयामध्ये दिनांक 14/05/2020 ते दिनांक 17/05/2020 या कालावधीकरिता लागु राहील.

सदरचा आदेश आज दिनांक 13 मे, 2020 रोजी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहिते यांच्यासह वैद्यकीय व महसूल विभागाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आज त्यांनी बैठक घेतली.

त्यानंतर त्यांनी 13 मे रोजी रात्री 12 वाजता पासून 17 मे रोजी पर्यंत फक्त चंद्रपूर शहरात जमावबंदी लागू केली आहे. 4 मे पूर्वी असणारे लॉकडाऊन कायम राहील, असे स्पष्ट केले.

त्यामुळे 14 मे पासून शहरांमध्ये फक्त जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी 7 ते 2 खुली राहणार आहे. नागरिकांना बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

Post a comment

0 Comments