Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

"कोरोना" 'नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांना आणा चंद्रपुरात - आम मुनगंटीवार
बाहेर शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आणण्याची भाजपची मोहीम


म.रा.प.महामंडळ अधिकारीसोबत झाली बैठक

चंद्रपूर /प्रतिनिधी

संपुर्ण विदर्भातून हजारो विदयार्थी उच्च शिक्षण घेण्यासाठी दरवर्षी शिक्षणाचे माहेरघर असणाऱ्या पुणे येथे वास्तव्यास असतात.परंतु हे विदयार्थी आता कोरोनाच्या संकटात सापडले आहेत.त्यांना स्वगृही आणण्याची विनंती अनेक पालकांनी केली आहे.विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्या विद्यार्थ्यांना,कोरोना संदर्भातील ,शासनाने सांगितलेल्या सर्व नियमांचे काटेकोर पणे पालन करून त्याना आणण्याचे नियोजन करा,अश्या स्पष्ट सूचना लोकनेते आम सुधीर मुनगंटीवार यांनी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.या अनुषंगाने नुकतीच एक बैठक चंद्रपुर बस स्थानक येथे पार विभागीय नियंत्रक पाटील यांचे सोबत पार पडली. त्यात महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
या वेळी उपमहापौर राहुल पावडे,जी प माजी सभापती व भा ज यु मो जिल्हाध्यक्ष ब्रिजभूषण पाझारे,स्वीयसचिव दत्तप्रसंन महादानी डॉ मंगेश गुलवाडे आणि प्रकाश धारणे यांची उपस्थिती होती.
चंद्रपुर जिल्यातील किमान ३२५० विदयार्थी पुण्यात शिक्षण घेत आहेत,या सर्वांनी व पालकांनी काही दिवसांपूर्वी माजी अर्थमंत्री आम सुधीर मुनगंटीवार यांचे कडे रीतसर ऑन लाईन अर्ज सादर केला.त्यामुळे हे नियोजन करताना राज्य परिवहन महामंडळाची भूमिका महत्त्वाची राहणार असल्याने त्यांचे सोबत सखोल चर्चा करण्यात आली. यात महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
विद्यार्थ्यांना किमान १५०बस ची व्यवस्था लागणार असून या बसेस चंद्रपुर व पुणे येथे स्यानेटाईज केल्या जातील.किमान ५ ठिकाणाहून विद्यार्थी यात बसतील.५मागे ५ बस सुटतील,विद्यार्थ्यांना औरंगाबाद व अहमदनगर भोजनाची सोय असेल.तेथील भाजप पदाधिकारी ही व्यवस्था सांभाळतील,चंद्रपुर जिल्ह्यतील तालुकानुसार बस ची व्यवस्था असेल,प्रत्येक विद्यार्थ्याची वैद्यकिय तपासणी करून आरोग्य योग्य असल्यावरच त्याना चंद्रपुर ला येता येईल. पुन्हा चंद्रपुरात त्यांची वैदकीय तपासणी केल्यावर आवश्यकता असल्यास त्याना घरी होम कोरोटाईन देखील करण्यात येईल असे अनेक निर्णय घेण्यात आले.तालुकास्थानी भाजप तालुका अध्यक्ष या विद्यार्थ्याचे स्वागत देखील करणार आहेत. सर्व विद्यार्थ्याना तज्ञ डॉक्टर्स मार्गदर्शन करतील असाही निर्णय यावेळी घेण्यात आला.

Post a comment

0 Comments