धक्कादायक :- चंद्रपुरात मिळाला दुसरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण


चंद्रपूर /प्रतिनिधी

चंद्रपुरात कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला असून 23 वर्षाच्या मुलीचा कोरोना अहवाल पॉसिटीव्ह आल्याची खात्रीलायक माहिती आहे. ही मुलगी 9 मे रोजी यवतमाळ येथून चंद्रपूर ला आली होती. तिचे 11 मे रोजी घशातील स्त्राव नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठवले होते. त्याचा अहवाल पॉसिटीव्ह आला आहे. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्ण मुलीची आई यवतमाळ येथे एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होती. दीड महिन्यापासून ती, तिचा भाऊ हे यवतमाळ येथे होते. हे तिघेही एका कारने चंद्रपुरात आले, त्यानंतर चालक कार घेवून परत गेला. अन्य दोघांचे स्त्राव घेतले जाणार आहेत. यापूर्वी कृष्णनगर एक इसम पॉझिटिव्ह आढळला होता. त्यांची स्थिती स्थिर असून त्याच्या संपर्कात आलेले एकही जण पॉझिटिव्ह आला नाही. अशातच दुसरा रुग्ण आढळला असून तो जनता कॉलेज परिसरातील आहे.


Post a comment

0 Comments