मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून केली मागणीचंद्रपूूर /प्रतिनिधी
दिनांक 8 मे
देशावर आलेले कोरोणाचे संकट लक्षात घेऊन सर्वत्र संचारबंदी लागू केली आहे मात्र चंद्रपूर व इतर जिल्ह्यातील काही युवक परराज्यात काम करण्यासााठी गेले आहे परंतु संचारबंदी मुळे इतर राज्यात अडकले आहे त्यापैकी काही राज्यातील लोकांना परत आणण्यात सरकारला यश देखील आले मात्र हरियाणा राज्यातील गुडगाव या शहरात मारुती सुझुकी सेक्टर 18 या कंपनीमध्ये चंद्रपूर व इतर जिल्ह्यातील काम करण्यास गेलेले युवक संचार बंदीमुळे हरियाणा या राज्यात मोठ्याा प्रमाणात अडकले आहे या युवकांना स्वगृही परत आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने त्वरित पावले उचलावी अशी मागणी आज भारतीय जनता पार्टीचे युवानेते अंकित जोगी यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून केली