चंद्रपूर :- देशात कोरोना विषाणूने दहशत पसरवली आहे कोरोना हा जीवघेणा व्हायरस पसरल्यानंतर लोकांना सुरक्षा म्हणून सतत मास्क आणि सॅनिटायजरने हात धुण्याचा सल्ला सरकार कडून दिला जात आहे म्हणून
दिनांक 12 मे 2020 रोजी बाबुपेठ वार्ड प्रभाग न.13 येथे गरीब व गरजू लोकांना मास्क आणि सॅनिटाईजरचे वाटप करण्यात आले. युवानेते मोहन चौधरी व सौ रंजनाताई श्रीवास्तव यांच्या मार्फत भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते पराग मलोडे यांना पुरवण्यात आले. व पराग मलोडे यांनी बाबुपेठ प्रभागातील गरजू नागरिकांपर्यंत वाटप केले आणि प्रत्येक नागरिकाला कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यांकरिता सुरक्षित कसं राहु शकतो हे पटवून दिले. तर बाबुपेठ प्रभागातील नागरिकांना मास्क आणि सॅनिटाईजर उपलब्ध करून दिले या करिता मोहन चौधरी व सौ रंजनाताई श्रीवास्तव यांचे आभार व्यक्त केले