माणिकगड (गडचांदूर) येथून ताब्यात घेतलेल्या तीन नागरिकांची नांदेड प्रशासनाकडून होणार पुढील पडताळणीनांदेड येथील पथक तीनही इसमांना घेऊन नांदेड ला रवाना 


दिनांक 6 मे 2020 रोजी रात्री च्या दरम्यान माणिकगड गडचंदुर जिल्हा चंद्रपूर येथे नांदेड येथून आलेल्या तीन नागरिकांना संशयावरून जिल्हा प्रशासन व पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले होते पोलीस व covid-19 नियंत्रण कक्ष च्या वतीने नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालय व पोलिसांसोबत संपर्क केला असता चंद्रपूर येथील ताब्यात घेतलेल्या तीन इसमांचे नावे हे नांदेड येथून पसार झालेल्या इस्मा सोबत मिळतेजुळते नसल्याची माहिती मिळाली तरी पुढील खबरदारी म्हणून नांदेड येथील पथक ॲम्बुलन्ससह चंद्रपूर येथे येऊन माणिक गड येथून तापात घेतलेल्या नांदेड येथील तीनही नागरिकांना घेऊन पुढील तपासणी व पडताळणीसाठी नांदेड येथे रवाना झाले आहे
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच जनतेमध्ये संभ्रम व भीती निर्माण होईल अशा प्रकारचे संदेश किंवा माहिती खात्री झाल्याशिवाय सोशल मीडियावर प्रसारित करू नये

Post a comment

0 Comments