MH34UPDATE News
दिनांक 6 /मे
चंद्रपूर :- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता शासनाने लॉकडाऊन तसेच वाहतुकबंदी केलेली आहे. त्यामुळे ऑटोचालक गेल्या १ महिन्यापासून संपूर्ण पने बेरोजगार झाले असुन त्यांच्या कुटुंबियावर उपासमारीची वेळ आलेली आहे. ते आपल्या शाळकरी मुला-मुलींना वर्षभर पोटच्या मुलांप्रमाणेच सांभाळून शाळेत ने-आन करीत असतात. असे असता आपण ठरविलेल्या मासिक दराची रक्कम सामाजिक कार्यकर्ते नागेश टोंगे यांनी ऑटोचालकास दिली यावेळेला ऑटो युनियन जिल्हाध्यक्ष शांताराम शिंदे आणि नानाजी गोखरे, संतोष बोबडे, संतोष शिरपूरकर उपस्थित होते
सर्वांनी सामाजिक दायित्व लक्षात घेऊन आपल्या ऑटोचालकास स्वइच्छेने मदत करावी. जेणेकरून त्यांचे कुटूंब उपाशी राहू नये, असे असे आव्हान नागेश तोंगे यांनी केले