पाणीपुरवठा बिल व घर टॅक्स आणि विद्यार्थ्यांची फी माफ करण्यासाठी वर्षा कोठेकर यांची मागणी

महापौर व शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली मागणी


चंद्रपूर :- कोविड-19 मुळे संचारबंदी लागू करण्यात आली यामध्ये सर्वसामान्य जनतेचे काम बंद झाले व कष्ट करी लोकांचे मोठे हाल झाले आहे अशा परिस्थितीमध्ये चंद्रपूर महानगरपालिकेने घर टॅक्स व नळ बिल माफ करावे अशी मागणी शिवसेना महिला आघाडीच्या वर्षा कोठेकर यांनी चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर राखीताई कंचरलावार यांना निवेदन देऊन करण्यात आली यावेळेला महापौर राखीताई कांचरलावार यांनी घर टॅक्स माफ करू आणि नळ बिला बद्दल विचार करून असे आश्वासन दिले
त्याच बरोबर प्रायव्हेट शाळेची तीन महिन्याची फी माफ करण्यात यावी यासाठी शिवसेना महिला आघाडीतर्फे शिक्षण अधिकारी अा. डोर्लीकर यांना निवेदन देऊन मागणी केली यावेळेला शिवसेना महिला आघाडीच्या शहर संघटिका वर्षा कोठेकर राणी येलेकर विद्या चितळे उपस्थित होत्या.

Post a comment

0 Comments