तालुक्यात विविध ठिकाणी सीसीआय कापूस खरेदी केंद्राची ब्रिजभूषण पाझारे यांची मागणी

चंद्रपूर/प्रतिनिधी
चंद्रपूर तालुक्यातील धानोरा येथील  सीसीआय उपकेंद्रात तालुक्यातील शेतकरी कापूस विक्री करतात. परंतु धानोरा येथील सीसीआय उपकेंद्राबाबत बाबत शेतकरी असंतुष्ट असल्याचे चित्र दिसत आहे. सीसीआय केंद्रातून ४००० कापूस विक्री करणाऱ्या शेतकऱ्याच्या नावाची नोंद झाली आहे. आणि संपूर्ण शेतकरी हे चंद्रपूर तालुक्यातील आहे.   धानोरा येथे उपकेंद्र असलेले हे सीसीआय शेतकऱ्याच्या कापूस विक्री कडे कानाडोळा करून खासगी संस्थान कडून  कापूस विक्री करीत असल्याचे तक्रार कापूस विक्रीकरांनी केली आहे. 
 सदर सीसीआय केद्रात प्रतिदिवस कापसाच्या २० तर कधी ३० गाड्या खाली होतात. जेव्हा कि यादी नुसार ४००० शेतकऱ्याचे कापूस विक्री करिता सीसीआय केंद्रांनी प्रत्येकाला टोकन दिले आहे. परंतु रोजचा कापूस गाडी खाली करण्याच्या प्रक्रियेनुसार संपूर्ण वर्ष लागेल कि काय हा प्रश्न शेतकर्यांना पडलेला आहे. 
 सीसीआय अंतर्गत कापूस खरेदीला एक विशिष्ट किमत आखून देण्यात आलेली असते, परंतु धानोरा येथील सीसीआय केंद्र खासगी कापूस खरेदी विक्री कडे लक्ष देत असल्याने शेतकर्याना मनस्ताप सहन करावा लागत आहे. शारीरिक व मानसिक त्रासात शेतकरी गुंनतून पडलेला आहे. नवीन मारडा येथील पुरुषोत्तम उरकुडे या व्यक्तींनी संपूर्ण माहिती गोळा केली व शेतकर्यांना होणार्या त्रासाबाबत पाउल उचलले. 
 धानोरा सीसीआय केंद्रात होत असलेल्या व्यवहाराबाबतची माहित जि.प सदस्य ब्रिजभूषण पझारे यांना सांगितले. ब्रिजभूषण पाझारे यांनी देखील हि संपूर्ण बाब माजी अर्थमंत्री आ.सुधीरभाऊ मूनगंटीवार यांचा कडे मांडली व त्यांच्या मार्गदर्शनातून धानोरा येथे जाऊन शेतकऱ्याशी संपर्क साधून आढावा जाणून घेतला व पुरुषोत्तम उरकुडे यांचा सोबत जिल्हा उपनिबंधक अधिकारी सहकारी संस्था चंद्रपूर यांची भेट घेतली व धानोरा येथील उपसिसीआय केंद्रात होत असलेल्या घोटाळ्याची माहिती दिली. 
 चंद्रपूर  तालुक्यात पांढरकवडा, साखरवाही, एम.आय.डी.सी या ठिकाणी सीसीआय केंद्राची उभारणी करण्याची देखील मागणी करण्यात आली. व धानोरा सीसीआय उपकेंद्र येथे कापूस विक्री करणाऱ्या शेतकऱ्याचा दररोज १०० ते १५० गाड्या खाली करण्यात यावा. त्यामुळे शेतकऱ्याच्या कापूस लवकर विकला जाईल तसेच  त्यामुळे शेतकऱ्यांचे  आर्थिक बाजू बळकट होईल. आणि नव्या पिकाचे बी-बियाणे घेण्यास त्यांना सहाय्य होईल.  संचारबंदी मुळे शेतातील पिकांची मागणी घटली आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. आणि त्यात सीसीआय केंद्राकडून होत असलेल्या या घोटाळ्यामुळे तालुक्यातील कापूस विक्री करणारा शेतकरी अडचणीत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

Post a comment

0 Comments