चंद्रपूर : बँक व्यवहारात ऑनलाईन फसवणूक, रक्कम रिफंड करण्यामध्ये सायबर सेलला यश


चंद्रपूर.16 मे (MH34UPDATE News) : जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील सास्ती येथील एका व्यक्तीची बँक व्यवहारात ऑनलाईन फसवणूक झाली होती. त्या फसवणूक झालेल्या फिर्यादीचे खात्यामध्ये परत १ लाख ४० हजार रुपये रिफंड करण्यामध्ये चंद्रपूर सायबर सेलला यश आले आहे. राजुरा तालुक्यातील सास्ती येथील एका व्यक्तीस आलेल्या फोन वरून सिमकार्ड अपग्रेड करायचे आहे का अशी विचारणा करण्यात आली. सदर व्यक्तीने होकार दिल्यानंतर त्या व्यक्तीस काही एसएमएस प्राप्त होऊन नंतर त्याचे सिमकार्ड एक दिवसा करता बंद झाले. सदर व्यक्तीचे बंद झालेले सिमकार्ड हे त्याचे आयसीआयसीआय बँका त्याखात्यासोबत जोडलेले असल्याने फसवणूक करणारे अज्ञात आरोपीने फिर्यादीचे मोबाईल नंबरचा उपयोग करून त्याचे बँक खात्यातील १ लाख ४० हजार रुपये काढून घेतले.याबाबतची माहिती ताबडतोब बँकेसह चंद्रपूर सायबर सेलला दिल्यानंतर राजुरा येथे तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान चंद्रपूर येथून तात्काळ संबंधित बँकेसोबत संपर्क करून तांत्रिक मुद्द्यावर तपास केला गेला. सायबर सेल येथील पोलिसांनी दाखवलेल्या कार्यतत्परतेमुळे फिर्यादी सोबत फसवणूक करून बँक खात्यातून काढण्यात आलेली रक्कम १ लाख ४० हजार रुपये १३ मे रोजी फिर्यादीचे बँक खाते मध्ये रिफंड झाली आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. दरम्यान मोबाईल फोनवर कोणत्याही अज्ञात व्यक्तीला बँक खाते किंवा वैयक्तिक माहिती शेअर करू नये तसेच ऑनलाईन व्य वहार करतांना संपूर्ण दक्षता घेण्याचे आवाहन पोलिस विभागातर्फे करण्यात आले आहे

Post a comment

0 Comments