दहशत माजवणाऱ्या युवकाला जमावाने दिला चोप - युवकाचा मृत्यूदोन आरोपींना अटक एक आरोपी फरार


चंद्रपूर : नागभीड प्रतिनिधी -
नागभीड शहरातील काही परिसरात अकारण दादागिरी करून सतत लोकांना धमकावून मनमानी, चिरीमिरीची वसुली करनाऱ्या एका युवकाला प्राणास मुकावे लागले. 

सविस्तर माहिती नुसार नागभीड शहरातील शिवनगर येथे परिसरातील लोकांना मकबुल मुनिर खान पठाण (22) रा.नागभीड शिवनगर हा युवक अकारण  दादागीरी दाखवून धमकवित होता. कोणत्याही लहान -सहान कारणावरून हा अनेकांना त्रास द्यायचा.
 
या जाचाला कंटाळून परिसरातील लोकांनी संगनमत करून त्याला चोप दिला परंतु यात त्या युवकाचा मृत्यू झाला. दिनांक 7 मे रात्री 10-10:30च्या सुमारास या युवकाने काही लोकांना दादागिरीने त्रास देण्याचा प्रयत्न केला,याला कंटाळून परिसरातील लोकांनी एकमत करून जमाव करून मकबुल मुनिर कडे गेले असताना, अचानक लोकांचा जमाव रोष बघून याने पळ काढला. तरीही लोकांनी त्याला गाठत  मारहाणकेली , यात तो गंभीर जखमी झाला.लागलीच याची माहितीपोलिसांना देण्यातआली पोलिसांनी त्याला ग्रामीणरूग्णालयात भर्ती केले.

परंतु या युवकाचा उपचारा दरम्यान त्याच्या मृत्यू झाला असून पोलिसांनी जमावातील  ऊमर फारूख शेख( 55), हरिनारायण मांढरे (25), सुनिल मांढरे (45) यांच्या वर कलम  302, 452, 324, 323, 143, 148, 149 या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून यात दोघांना तात्काळ ताब्यात सुनिल मांढरे फरार आहे. 

पुढील तपास शिंदे उपविभागीय पोलिस अधिकारी ब्रम्हपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार दिपक गोतमारे, एपीआय कोरवते, पिएसआय सोनेकर सहित नागभीड पोलीस ठाणे चमू करीत आहे

Post a comment

0 Comments