धान्य कीट वाटपाचा झोन अधिकाऱ्याकडून नगरसेविका सोयाम यांनी घेतला आढावा
चंद्रपूर प्रतिनिधी
  
देशात कोविड -19 सारख्या मोठ्या संकटाचे गांभीर्य लक्षात घेऊन 23 मार्चला संचारबंदी लागू करण्यात आली. अशा परिस्थिती मध्ये अनेक कामगार कष्टकरी लोकांवरती उपासमारीची वेळ येऊ नये, म्हणून केंद्र शासनाने राशन कार्ड असणाऱ्या गरजू व्यक्तींना मोफत धान्य वाटप करण्यात आले, परंतु ज्यांच्याकडे राशन कार्ड नाही अशा लोकांवरती उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून चंद्रपूर महानगरपालिका द्वारे राशन कार्ड नसनाऱ्या लोकांची यादी नगरसेवका द्वारे मागविण्यात आली होती. मागविण्यात आलेल्या यादी नुसार राशन कार्ड नसलेल्या लोकांना 5 मे पासून झोन नुसार धान्य किट वाटपाला सुरुवात झाली असून या धान्य किट वाटपाचा  नगरसेविका  चंद्रकला सोयाम यांनी बंगाली कॅम्प झोन अधिकाऱ्याकडून आढावा घेतला व सोशल डिस्टन्स पाळून धान्य किट वाटप करावे अशा सूचना त्यांच्याद्वारे करण्यात आल्या.

Post a comment

0 Comments