महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांच्या ज्वलंत प्रश्नाला योद्धास आर्गेनाइजेशन नी मुख्यमंत्र्यांण कडे मांडलीयोद्धास आर्गेनाइजेशने मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून केली मागणी

चंद्रपूर/प्रतिनिधी
राज्य सरकारने कोरोणा महामारी मुळे परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना दिलासा देणारा  निर्णय जाहीर केला त्याबद्दल विद्यार्थ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे तरी विद्यार्थ्यांच्या आणखी काही मागण्या योद्धास  आर्गेनाइजेशनच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्याकडे ठेवण्यात आल्या. 
शैक्षणीक वर्ष २०२०-२१ ला प्रवेश घेताना विद्यार्थांना फी  भरावी लागेल. विद्यार्थ्यांकडून महाविद्यालये जी प्रवेश फी आकारतात ती हजारोंच्या घरात आहे व बऱ्याच कोर्सेसची फी लाखोंच्या घरात जाते. या कोरोना महामारी मुळे विद्यार्थांचे पालक आर्थिक बोझ्याखाली आहे त्यामुळे त्यांना  प्रवेश शुल्क करावे सुरवातीला एकाच टप्यात भरणे शक्य नाही. म्हणुन प्रवेश घेताना सुरवातीलाच महाविद्यालयांकडुन विद्यार्थांना पुर्ण फी भरणे सक्तीचे न करता पहील्या टप्यात जास्तित जास्त २५% कींवा त्या पेक्षा कमी घेण्यात यावे आणी बाकीचे ७५% शुल्क विद्यार्थांना टप्या टप्याने भरण्याची मुभा द्यावी. आणी ज्या सत्र/वर्षाच्या परिक्षा आता रद्द झाल्या आहेत त्या विद्यार्थांनी त्या रद्द परिक्षांचे परिक्षा शुल्क पुर्ण भरलेले आहेत, ते शुल्क १००ते ५००रु च्या दरम्यानचे आहेत, परिक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थांना ते शुल्क परत देण्याची व्यवस्था करुन द्यावी, तेवढाच विद्यार्थांना या आर्थिक संकटात आधार मिळेल. कींवा तेच शुल्क पुढील सत्र/वर्षाच्या परिक्षांसाठी गृहीत धरुन त्या वेळी परिक्षा शुल्क आकारु नये.
 अशी मागणीचे निवेदन चंद्रपूर जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना केली या प्रसंगी योद्धास आर्गेनाइजेशनचे प्रमुख पंकज गुप्ता, महानगर अध्यक्ष गौरव राजपूत, विद्यार्थि नेते शुभम जगताप, चंद्रपुर विधानसभा क्षेत्राचे उपाध्यक्ष सुनील सोनार , विष्णु प्रसाद यांची उपस्थिति होती।

Post a comment

0 Comments