Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

घुग्गुस येथे बुद्ध पौर्णिमा निमित्त मास्क वितरणमाजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांचा पुढाकार


बुद्ध पौर्णिमा निमित्त मास्क वितरण करताना माजी जिल्हा परिषद अध्यक्ष

घुघुस शहरात अभिनव उपक्रमांद्वारे बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली. बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून प्रत्येक परिवाराला मास्क वाटपाच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.  
 भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला वंदन करून बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली, यावेळी बुद्ध वंदना घेण्यात आली.

भाजपा शहराध्यक्ष विवेक बोढे यांनी मुलाचा वाढदिवस साजरा न करता 5000 मास्क वितरणासाठी उपलब्ध करून दिले. कोरोना खबरदारीच्या पार्श्वभुमीवर त्यांनी आपल्या मुलाचा वाढदिवसाचा खर्च न करता समाजीक बांधीलकी जोपासुन नागरिकांना मोफत मास्क वाटप करण्यासाठी उपलब्ध करून दिले.
 सर्व मास्क वार्ड क्रमांक सहा मधील नागरिकांना मोफत वाटप करण्यात येनार आहे. बुद्ध पूर्णिमा साजरी करुन मास्क वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

या प्रसंगी मनोगत व्यक्त करतांना माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले की आज विश्र्वापुढे कोरोणाचे संकट उभे ठाकले आहे. या संकटावर मात करण्यासाठी आपण सर्वांनी घरी राहिलेच पाहिजे. सोशल डिस्टन्ससींग पाळली पाहिजे. प्रत्येक नागरिकाने घराबाहेर पडताना मास्क वापरलेच पाहिजे. आपण सर्व मिळून या जागतिक महामारीचा सामना करून त्यावर निश्चितच विजय प्राप्त करू.

या वेळी माजी जिप अध्यक्ष देवराव भोंगळे, घुग्गुस भाजपा शहराध्यक्ष विवेक बोढे, जि.प. महिला व बाल कल्याण सभापती नितुताई चौधरी, पं.स. उपसभापती निरीक्षण तांड्रा, सरपंच संतोष नुने, सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र चंदनखेडे, माजी जि.प. सदस्य चिन्नाजी नलभोगा, ग्रां.प. सदस्या सुचिता लुटे, ग्रां.प. सदस्या सुषमा सावे, ग्रां.म. सदस्य संजय तिवारी, माजी सरपंच राजकुमार गोडसेलवार, भाजपा नेते पुंडलिक उरकुडे, विनोद चौधरी, हेमंत उरकूडे, दिलीप कांबळे, महेंद्र साठे, बंडू रामटेके, पंकज रामटेके, अतुल चोखंद्रे, नितीन काळे, विवेक तिवारी, विनोद जिंजरला, कोमल ठाकरे, रवी बोबडे उपस्थित होते. संचालन साजन गोहने ग्रां.प. सदस्य घुग्गुस यांनी केले तर आभार बबलु सातपुते यांनी मानले.

Post a comment

0 Comments