Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

सहाय्यता निधीत भरघोस मदतीचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन!


जिल्हाधिकारी सहाय्यता निधीसाठी 71 लक्ष तर
मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या खात्यात 1 कोटी 17 लक्ष 16 हजार रुपये जमा!MH34UPDATEnews
चंद्रपूर : कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक मदतीसाठी केलेल्या आवाहनाला जिल्ह्यातील सरकारी, सहकारी संस्था व दानशूर व्यक्तीकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. कलेक्टर चंद्रपूर कोव्हिड-19 या नावाने जिल्ह्यातील अग्रणी बँक ऑफ इंडियामध्ये ‍ स्वतंत्र खाते उघडण्यात आले असून खाते क्रमांक 960310210000048 असून यासाठी आयएफएससी कोड BKIDOOO9603 असा आहे.

कोविड 19 विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन काटेकोर उपाययोजना करत असून मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड-19 हे स्वतंत्र बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आले आहे. त्याचा बचत खाते क्रमांक 39239591720असून यासाठी आयएफएससी कोड SBIN0000300 असा आहे.
जिल्ह्यातील उद्योजक, कंपन्यांचे प्रमुख, स्वंयसेवी संस्था, धार्मिक संस्था राज्य शासनाच्या बरोबरीने या युद्धात सहभागी होऊन मदत करू इच्छितात. त्या सर्व संस्था आणि नागरिकांनी सढळ हाताने मदतीची रक्कम जमा करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.
कोरोना संकट निवारण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांसाठी आर्थिक अडचण येऊ नये, यासाठी मदतीचे आवाहन करण्यात येत असून आजपर्यंत सुमारे 71 लक्ष रुपयांचा निधी जिल्हाधिकारी सहाय्यता निधीसाठी तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या स्वतंत्र बँक खात्यात 1 कोटी 17लक्ष 16 हजार रुपये उपलब्ध झाले आहे.
आज प्रामुख्याने जिल्हा सहायता निधीमध्ये श्रीकृष्ण राईस मिल तळोधी (बा) व्यंकटेश राईस इंडस्ट्रीज तळोधी (बा), गुप्ता राईस एक्सपोर्ट नागपूर यांच्यावतीने प्रत्येकी रु.11 हजार,संजय रामदास पांडे चंद्रपूर यांच्याकडून रु.15 हजार 500, रुपयाचा धनादेश सहाय्यता निधी देण्यात आला. तर ऐश्वर्या ग्रामीण बिगर शेती सह. पतसंस्था पळसगाव, आदिवासी विविध कार्यकारी सह.पतसंस्था जांभुळघाट, श्रीराम ग्रामीण बिगर शेती सह.पतसंस्था ब्रह्मपुरी सहकारी संस्थांच्या वतीने प्रत्येकी रु.5 हजार रुपयाचा धनादेश सहाय्यता निधीस देण्यात आला.
त्यासोबतच मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 या स्वतंत्र बँक खात्यामध्ये विस्तार अधिकारी, चंद्रपूर (जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा) प्रीती वेल्हेकर यांच्याकडून रु.55 हजार 453, रवींद्र येनारकर चंद्रपूर यांच्याकडून रु.41 हजार, इंदिरा गांधी गार्डन स्कूल रामनगर,चंद्रपूरच्या वतीने रु.41 हजार, न्यू इंग्लिश हायस्कूल चंद्रपूरच्या वतीने रु.23 हजार,श्री बालाजी हायस्कूल बामणी, बल्लारपूरच्या वतीने रु.12 हजार 100, अवंथा होल्डिंग युनिट लिमि.आष्टीच्या वतीने रु.1 लक्ष 33 हजार 291 तर बिल्ट ग्राफिक पेपर प्रॉडक्ट लिमिटेड युनिट आष्टीच्या वतीने रु.1 लक्ष 37 हजार 828 मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies