जागतिक मातृ दिनानिमित्य सफाई कामगारांचा शिवसेना - युवा सेना तर्फे सत्कार  चंद्रपूर / प्रतिनिधी
 संपूर्ण देशात कोरोना वायरसने थैमान घातला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे या वर प्रतिबंधक म्हणून राज्यसरकार ने राज्यात संचार बंदी लागू केली आहेत.चंद्रपूर महानगर पालिका चे सफाई कामगार यांनी covid-19 ला लढा देत स्वतः जीव धोक्यात घेऊन दिवस रात्र एक करून सफाई करत असतात त्यामुळे मातृ दिनाचे औचित्य साधून आज  शिवसेना जिल्हाअध्यक्ष मा. संदीप जी गिऱ्हे, प्रमोद पाटील (महानगर प्रमुख), संतोष नरुले (तालुका प्रमुख ),निलेश बेलखडे (युवा सेना जिल्हा समन्वय),व स्वप्नील काशीकर यांच्या मार्गदर्शनात सौ. शोभाताई वाघमारे (शिवसेना महिला आघाडी ) व अक्षय अंबिरवार (युवा सेना शहर प्रमुख) यांनी सफाई कामगारांचा सत्कार करून त्यांना भेटवस्तू देण्यात आली.  यात अशोक दुर्शेलवार, शंतनू टिपले,मंथन वसाड, प्रियंन बोरकुटे, सोनु झोडे हर्षद दुर्शेलवार वैभव पडगेलवार उपस्तित होते ......

Post a comment

0 Comments